
प्रतिनिधी लहुजी लांडे
शरद कमल आनंदराव बुट्टे पाटील लिखित संवेदना अंतर्मनाची पुस्तकाचे प्रकाशन सोहळा रविवार दि. 13 एप्रिल 2025 रोजी दुपारी ठीक तीन वाजता हॉटेल राजरत्न पुणे नाशिक हायवे रोड संतोषनगर ,भाम या ठिकाणी संपन्न होणार आहे. महेश म्हात्रे संपादक संचालक महाराष्ट्र रिसर्च सेंटर, संजय भेगडे मा.राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, योगेश कुटे संपादक लेटेस अप, यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी सुनील चांदेरे उपाध्यक्ष पु.जि.म सह बँक ,सुनील जोशी उपयुक्त पि. चि. मनपा ,सुनील महाजन अध्यक्ष अ.भा. नाट्य परिषद कोथरूड,विठ्ठल जाधव ज्येष्ठ पत्रकार,डी के वळसे पाटील ज्येष्ठ पत्रकार ,राजेंद्र सांडभोर ज्येष्ठ पत्रकार या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन संतोष गाढवे अध्यक्ष मसाप राजगुरुनगर शाखा, प्रमोद भावसागर प्राईम प्रिंटर्स हे करणार आहे. आपण उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी असे शरद कमल आनंदराव बुट्टे पाटील यांनी सांगितले.