चाकण पठारवाडी


पठारवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला वन खात्याकडून सतर्कतेचा इशारा
चाकण पठारवाडी परिसरात गेले चार-पाच दिवसात बिबट्याचा वावर वाढला असून येथील पाळीव प्राणी गायीचे वासरू, पाळीव कुत्री व बकरा वरती हल्ला केला असून संतोष पठारे या शेतकऱ्याचे वासराला बिबट्याने गोठ्यात हल्ला करून वासराचे लचके घेऊन वासरू जागीच मृत्यू मुखी पाडले आहे. तसेच विशाल पठारे यांच्या ऊसामध्ये ही बिबट्या येथील नागरिकांनी पाहीला आहे. पठारवाडी परिसरात बागायती क्षेत्र असून या परिसरात बिबट्याचे ठसे वारंवार दिसून येत आहेत या विषयाची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन, वन कर्मचारी दिपाली रावते, रेस्क्यु टीम मेंबर प्राध्यापक अतुल सवाखंडे, रत्नेश शेवकरी, विशाल बारवकर आणि इतर वन विभागाचे कर्मचारी यांनी पठारवाडी येथे घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधून माहिती दिली आणि सर्वांनी काळजी घ्यायचे आवाहन केले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला जिवंत जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. तसेच रेस्क्यू टीमच्या वतीने या परिसरातील नागरिकांना बिबट्या पासून सुरक्षिततेसाठी कोणकोणत्या उपाययोजना करायच्या याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन आल्हाट, नवनाथ पठारे, संपत पठारे, संतोष पठारे, पीसीएमटी कंडक्टर राजेश पठारे, पांडुरंग पठारे, तुषार पठारे, किरण पठारे, हनुमंत पठारे इतर नागरिक, महिला भगिनी व वन कर्मचारी उपस्थित होते.