पर्यावरण पूरक हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

चाकण वार्ताहर
दि. 17 जानेवारी

चाकण नगरपरिषद

पर्यावरण पूरक हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन

चाकण वार्ताहर
दि. 17 जानेवारी

चाकण नगरपरिषद चाकण, कारपे संस्था, औरंगाबाद आणि विश्वशांतीनिकेतन विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांति निमित्त पर्यावरण पूरक हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विविध प्रकारच्या औषधी वनस्पती कढीपत्ता, तुळस, आवळा, अडुळसा, सुपारी, बडीशेप, कोरफड, पुदिना, कडुलिंब, लिंबु आणि मांगल्याचा आणि सौभाग्याचे प्रतीक तुळशीचे रोप वाण म्हणून सुवासिनिंना हळदी कुंकू देऊन देण्यात आले. यानिमित्ताने परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पांढरपट्टे साहेब यांनी कार्यक्रमाचे महत्व समजावून सांगितले. आरोग्यासोबत पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे.
चाकण नगरपरिषदेच्या
प्रियंका राऊत, कोमल माने, दिपाली आहीराव, कविता पाटील, विजय पांढरे, प्रियंका राऊत, सुरेखा गोरे, कीर्ती गुरव, करिष्मा बडगुजर, स्नेहल गोरे, स्वाती बिरादार, गायत्री भुजबळ, कारपे संस्था, औरंगाबाद, स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, शिवाजी दामोदरे, महादेव सांगळे, रेश्मा डावरे, विजय भोसले, अभय मेंढे, हर्षद इंदोरे, आदी नगरपरिषदेच्या कर्मचारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यासोबतच विश्वशांतीनिकेतन विद्यालयातील सर्व महिला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सर्व महिला कर्मचारी पदाधिकाऱ्यांनी आणि विद्यालयाच्या सर्व पालक महिला वर्गणी उखाणा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला सहभाग घेतला. तुळसी हे मांगल्याचे प्रतिक आहे, ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे, वारकरी संप्रदायामध्ये याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री तुळशीचे देऊन सर्व सर्व सुवासिनीचे महिला भगिनींचे देण्यात आले.

चाकण नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, कर्मचाऱ्यांचे शाल आणि तुळशीचे देऊन प्राचार्य अर्चना प्रवीण आघाव यांच्या हस्ते करण्यात आला. रेश्मा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अशी माहिती संस्थेचे डायरेक्टर प्रा. प्रवीण आघाव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents