
गुंडेगावातील अवैध धंदे च्या विरोधात भाऊसाहेब शिंदे चे 26 जानेवारी रोजी आमरण उपोषण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नी दिले प्रशासनास कारवाई चे आदेश
अहमदनगर : गेल्या अनेक वर्षा पासून गुंडेगावात बेकायदेशीर दारू विक्री केली जात होती त्या बरोबर मोठया प्रमाणात अवैध धंदे सुरु असून या बाबत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी प्रशासनास वेळोवेळी कल्पना दिल्या होत्या या अगोदर त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कडे तक्रारी केल्या होत्या त्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक यांना आदेश देऊन गुंडेगावातील अवैध धंदे बंद करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या नंतर काही महिने गुंडेगावातील बेकायदेशीर दारू विक्री बंद झाली होती पुन्हा मोठया प्रमाणात बेकायदेशीर दारू विक्री चालू झाल्याने सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी अहमदनगर चे जिल्हाअधिकारी राजेंद्र भोसले व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना लेखी निवेदन दिले असून गुंडेगावातील बेकायदेशीर दारू विक्री, अवैध धंदे येत्या आठ दिवसात बंद करा अन्यथा 26 जानेवारी रोजी गुंडेगाव येथील श्रीराम व्यासपीठ येथे आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन भाऊसाहेब शिंदे यांनी दिले असून याची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेऊन गुंडेगावातील अवैध धंदे तात्काळ बंद करा असा सूचना प्रशासना ला दिल्या आहेत मुख्यमंत्री यांच्या सूचने नंतर प्रशासन स्तरावर हालचाली ना वेग आला असून अनेक पथक गुंडेगावात दाखल होताना दिसत आहे
