मुला मुलींचे लग्न लावण्यासाठी मध्यस्थी करून लाखो रुपयांस गंडा घालणाऱ्या वर कारवाई करण्याची शिवशंभू छावा प्रतिष्ठानची मागणी लग्न लावण्यासाठी मुलगी पाहणाऱ्या मुलाची संपूर्ण माहिती गोळा करून त्या मुलाचे मुलगी दाखवून लग्न लावून देऊन त्याच्याकडून लाखो रुपये गोळा करणाऱ्या एजंटांवर कारवाई करण्यात यावी म्हणून शिवशंभू छावा प्रतिष्ठानच्या वतीने खेड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. शिवशंभू छावा प्रतिष्ठान कडे किशोर जाधव राहणार वोडततांगडा तालुका भोकरदन जिल्हा जालना व काजल मनोज पाटील राहणार जळगाव यांनी मदत मागितली की आमचे लग्न हे फसवणूक करून झाले आहे तरी आम्हाला आपल्या संघटनेच्या वतीने न्याय देण्यात यावा त्याप्रमाणे आज शिवशंभू छावा प्रतिष्ठानच्या वतीने खेड पोलीस स्टेशनचे पीआय माननीय सतीश गुरव साहेब यांस निवेदन देण्यात आले. यावेळी अॕड.गणेश सांडभोर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य,मा.भरतशेठ पवळे संस्थापक अध्यक्ष, माननीय दत्तात्रय टाकळकर पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय पी डी पाटील संदीपराजे निंबाळकर, संदीप खुटवड, बाळासाहेब येवले, सौ.अर्चनाताई हजारे सचिव,अनुराधा गावडे, अशोक मुके तालुकाध्यक्ष, बबनराव खेसे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते माननीय मनोहर गोरगल्ले पुणे जिल्हा प्रतिनिधी