

S.P. फायटर्स आयोजित,
स्व.रामदासभाऊ गावडे यांच्या स्मरणार्थ,
आदर्श उपसरपंच चषक वासुली (पर्व ५ वे)
शुक्रवार दि. २० जानेवारी २०२३ ते मंगळवार दि. २४ जानेवारी २०२३ दरम्यान भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये,
प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (रु/-२०,०००) – MBCC क्रिकेट संघ वडगाव पाटोळे,
द्वितीय क्रमांक (रू/-१५,०००)
कांगाई क्रिकेट संघ,मिंडेवाडी,
तृतीय क्रमांक (रु/-१०,०००)
सायंबा क्रिकेट संघ,केंदुर
चतुर्थ क्रमांक (रू/-७,०००)
S.P. फायटर्स वासुली,
पंचम क्रमांक (रू/-५,०००)
शिवरत्न फायटर्स वासुली,
या संघाना रोख बक्षिस व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन,
श्री. सुरेशराव पिंगळे देशमुख
(आदर्श उपसरपंच वासुली,MD सायली उद्योग समुह)
यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व विजेत्या संघाचे कौतुक केले,
क्रिकेट स्पर्धा या फक्त आदिवासी ठाकर समाजासाठी राखीव असतात यामध्ये अनेक संघ सहभागी होत असतात,ठाकरवाडी आणि आपल्या तील एकीचे प्रतीक म्हणून ह्या स्पर्धांचे आयोजन आपण करत असतो,
असे उपसरपंच सुरेश पिंगळे देशमुख आपल्या भाषणात म्हणाले.यावेळी
सौ.रत्नाताई सुरेश पिंगळे देशमुख
(अध्यक्षा- राजमाता जिजाऊ महिला संस्था,ग्रा.सदस्या वासुली)
सौ.कांताबाई गावडे (माजी ग्रा.स.वासुली)
श्री.अशोक गावडे (ग्रा.सदस्य,वासुली)
श्री.अमोल घुले पाटिल (उद्योजक)
श्री.अंकुश पिंगळे (उद्योदक)
श्री.सुमित भोरे (युवा उद्योजक)
श्री.खंडुशेठ निकम (उद्योजक)
श्री.विकास जांभुळकर (निवेदक-पत्रकार )
आदी मान्यवर उपस्थित होते.
धन्यवाद,
अस्सल न्यूज़ महाराष्ट्र करिता,
प्रतिनिधी-
विकास जांभुळकर
वासुली