

सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली रस्ते,वाहतुक केंद्रीय मंत्री नाम.नितीन गडकरी यांची भेट. . .
नुकतीच दिल्ली येथे खेड तालुक्यातील विविध पक्षाच्या नेते व पदाधिकारी यांनी नाशिक महामार्ग एल्वेटेड काँरिडोअर डी पी आर टेंडर प्रोसेस याबाबतीत केंद्रीय मंत्री मा.नितीन गडकरी यांच्याशी सकारात्मक अशी चर्चा केली.लवकरच प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल व तालुक्तातील जनता वाहतुक कोंडीपासुन श्वास मोकळा घेईल. काम जलदगतिने पूर्ण व्हावे. जोपर्यंत काम पुर्ण होत नाही.तोपर्यंत सर्वसामान्याकडुन टोल घेण्यात येऊ नये अशी मागणी रिपाई नेते हरेशभाई देखणे यांनी मंत्री महोद्य यांच्याकडे केली.खेड तालुक्यातील विविध प्रश्न देखिल यावेळी मांडण्यात आले.
पुणे नाशिक महामार्गाचे समन्वयक तसेच भाजपचे नेते दिलिप मेदगे,रिपब्लिकन नेते हरेशभाई देखणे,वंचित बहुजन आघाडीचे दत्ताभाऊ कांबळे,राष्ट्रवादी काँग्रेस चे चाकण शहर अध्यक्ष राम गोरे, चाकण -पुणे महामार्ग वाहतुक कोंडी कृती समितीचे कुमार गोरे,राष्ट्रवादी काँग्रेस खेड ता.अल्पसंख्याक आघाडीचे मोमिन काझी,बिरदवडीचे मा.सरपंच दत्ता चौधरी इ. उपस्थित होते.