आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नगरपरिषद कार्यालयात मा. मुख्याधिकारी श्री. सुनिल बल्लाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी सैनिकांचा नगरपरिषदेतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच चाकण शहरातील कुंदन हुंदाई शोरुम यांच्याकडे पर्यावरणाचा समतोल राखणेकरिता विक्रीसाठी दाखल झालेल्या (EV) Electric Car & व प्रदुषण विरहित CNG Car (Grand i10) यांचा माझी वसुंधरा 3.0 अंतर्गत चाकण नगरपरिषद येथे प्रदर्शन आयोजित करण्यात येऊन मा. मुख्याधिकारी श्री. सुनिल बल्लाळ यांच्या हस्ते सदर प्रदुषण विरहित गाड्यांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सन्माननिय माजी सदस्य, माजी सैनिक, चाकण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, चाकण नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व शालेय शिक्षक व विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.