

मुख्यमंत्री / जिल्हाधिकारी यांच्या आदेशा नंतर गुंडेगावात अनेक पथक दाखल
भाऊसाहेब शिंदे चे उपोषण सोडवण्यात राज्य उत्पादन शुल्क यशस्वी
अहमदनगर : गुंडेगाव येथे मोठया प्रमाणात अवैध धंदे चालू असल्याने यामध्ये बेकायदेशीर दारू विक्री, डिझेल, पेट्रोल, मावा, गोवा, यांची बेकायदेशीर विक्री च्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे 26 जानेवारी रोजी आमरण उपोषण ला बसले होते याची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कलेक्टर राजेंद्र, भोसले,एस.पी.राकेश ओला , तहसीलदार उमेश पाटील,राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक पाटील यांच्या नेतृत्वाखालील वेगवेगळ्या भरारी पथकाकडून गुंडेगावातील अनेक अवैध धंद्या वर छापे मारी करून गुन्हे दाखल करण्यात आले
नगर तहसिलदार उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील नायब तहसीलदार,पुरवठा इन्स्पेक्टर पवार साहेब,गुंडेगाव चे तलाठी कोतकर, कोतवाल रामदास सकट यांच्या पथकाने गुंडेगावातील बेकायदेशीर पेट्रोल डिझेल विक्री करणाऱ्या इसमा कडून जबाब घेऊन मा.तहसीलदार साहेब यांच्या सहीने लेखी नोटीस दिले असून यानंतर बेकायदेशीर पेट्रोल डिझेल विक्री करताना आढळल्यास आपणा विरोधात गुन्हा नोदवण्यात येईल अशा सूचना लेखी देण्यात आल्या
राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या पथका ने गुंडेगावात रात्री बेरात्री ग्रस्त घालून बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई करून मु्देमाला सह गुन्हे दाखल केले आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागातील अनेक भरारी पथक व पोलीस यंत्रणा गुंडेगावात मोठया संख्येने दाखल झाल्याने अवैध धंदे करणाऱ्याचे दाबे दणाणले असून गुंडेगावातील अवैध धंदे करणाऱ्याच्या सध्या झोपा उडल्याचे पाहायला मिळते
सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे हे 26 जानेवारी रोजी सकाळी 9 उपोषणाला बसले होते त्या अनेक संघटनेने व गावातील गावकरी यांनी जाहीर पाठींबा दिला त्यावेळी अनेक अधिकारी उपोषण मागे घ्यावे म्हणून प्रयत्न करत होते शिंदे मागण्या वर ठाम होते,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शिंदे चे उपोषण तात्काळ सोडवण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या नंतर 26 जानेवारी रोजी सकाळी मोठया प्रमाणात गुंडेगाव शिंदे चे उपोषण सोडवण्यासाठी मोठया प्रमाणात अधिकारी फौजफाटया सह गुंडेगावात दाखल होऊन शिंदे नी केलेल्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात शिंदे ना देऊन उपोषण सोडण्यास विनंती करून उपोषण सोडवण्यात आले
गुंडेगावातील बेकायदेशीर पेट्रोल डिझेल विक्री करणाऱ्या इसमास मा. तहसिलदार यांनी लेखी नोटीस दिली व जबाब घेतले,मा.नगर तालुका पोलीस स्टेशन चे निरीक्षक यांनी गुंडेगावातील अवैध धंदे वर कारवाई करण्यासाठी सातत्याने पोलीस पेट्रोलिंग करण्यात येईल असे लेखी पत्र दिले ,राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांनी गुंडेगावातील बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल अगोदर ज्या व्यक्ती विरोधात दारू विक्री चे गुन्हे असतील त्याच्या विरोधात तडीपार आदेश तसेच कठोर कारवाई करण्याचे पत्र दिले