
किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ, मोठ्या उत्साहात संपन्न…
किवळे प्रतिनिधी दि, 26 जानेवारी 2023 किवळे येथील हिंदूवीर प्रतिष्ठान आयोजित, भव्य किल्ले बनवा स्पर्धा, 2022 वर्षाच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण, 26 जानेवारी अर्थात 74 व्या प्रजासत्ताक दिनी पार पडले…
किल्ले बनवा स्पर्धेच्या 2022 वर्षामध्ये, एकूण 58 स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. खेड तालुक्यातील सर्वात मोठी किल्ले बनवा स्पर्धा असा या स्पर्धेचा नावलौकिक आहे.
त्यामध्ये प्रथम क्रमांक आयुष्य चंद्रकांत म्हसे, व्दितीय क्रमांक सोहम अरुण शिवले, तृतीय क्रमांक ऋतुराज रविंद्र कदम, उत्तेजनार्थ प्रथमेश संतोष म्हसे, समर्थ सर्जेराव बंधाटे याप्रमाणे निकाल होता…विजेत्या व सहभागी सर्व स्पर्धकांवर बक्षिसांची मोठया प्रमाणात लयलूट झाली…
यावेळी किवळे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मान्यवर, शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, गावचे युवक, महिला वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल राऊत, प्रास्ताविक भास्कर शिवले, आभार स्वप्नील साळुंके यांनी मानले.
धन्यवाद,
अस्सल न्युज महाराष्ट्र करीता,
-प्रतिनिधी,
विकास जांभुळकर