

चाकण नगर परिषद च्या वतीने पर्यावरण पूरक मकर संक्रांत उपक्रम राबविण्यात आला*
चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री सुनील बल्लाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 व माझी वसुंधरा3.0 च्या अनुषंगाने हा उपक्रम राबविला आला.
यामध्ये शहरातील विविध क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या कर्तबगार महिला,पोलीस कर्मचारी महिला आणि नगरपरिषद स्वच्छता विभागातील महिला कर्मचारी यांना आमंत्रित करून पर्यावरण पूरक मकरसंक्रांत साजरी केली
दरम्यान उपस्थीत महिलांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन कापडी पर्यावरन पुरक पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सर्वप्रथम नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री सुनील बल्लाळ सर यांनी राज्यात न्यायधिश परीक्षेत द्वितिय व मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या कु. बागडे मॅडम यांचा सन्मान केला . यानंतर मुख्याधिकारी सरांनी पर्यावरण पूरक मकरसंक्रांत विषयी तसेच स्वच्छतासंबंधी आपले मनोगत मांडले . पर्यावरण पूरक मकरसंक्रांत साजरी करताना पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल व स्वच्छता राखून आपले आरोग्य जपावे व नगर परिषदेला सहकार्य करावे असे सांगितले.
चाकण शहराच्या स्वच्छतादुत ह. भ. प. सौ . ज्योतीताई गरुड यांनी आपल्या मनोगता मधून उपस्थीत महिलांना संबोधित केले.दरम्यान महिलांनी आपला परिसर व आपले शहर स्व्छतेसाठी एकत्रित येऊन पुढे येणे गरजेचे आहे असे सांगितले.
यावेळी सन्माननिय माजी सदस्य, चाकण नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व शालेय शिक्षण तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते