
चाकण : वार्ताहर
दि. 3 फेब्रुवारी
चाकण येथील संतोष अकॅडमी आणि विश्वशांतीनिकेतन विद्यालय यांचा 11वा वार्षिक राष्ट्रीय पारितोषिक वितरण समारंभ आणि गुणगौरव कौतुक सोहळा भोसरी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधी तज्ञ डॉ. ऍड. सुधाकर आव्हाड, प्रमुख अतिथी ऍड. गोरक्ष आव्हाड, ऍड. गणेश शिरसाट बी इ. आव्हाड लॉ क्लासेस, पुणे, सरकारी सिव्हिल इंजिनिअर गणेश आघाव, श्री. भास्कर आव्हाड श्री. राजेंद्र आव्हाड यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकांनो, बदल ही काळाची गरज आहे. काळाप्रमाणे बदलणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत सतर्क राहणे आवश्यक आहे. बौद्धिक बुद्ध्यांकपेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित होती आहे, कायदा क्षेत्रास सर्व क्षेत्रात रोबोट येत आहेत. मुलांचा कल कुठे आहे हे शोधा, मुलांना कोणत्या प्रकारची जबरदस्ती करू नका. त्यांना हवा आहे ते करू द्या आताची पिढी खूप हुशार आणि गतिमान आहे. सध्या तांत्रिक युग आहेत तांत्रिक युगामुळे पालकांनी अपडेट राहणे आवश्यक आहे. आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण आणि चांगली शिक्षण देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. डॉ. सुधाकर आव्हाड यांनी केले.
विद्यार्थ्यांनी कल्पकता, कल्पनाशक्ती याचा वापर करून जीवनात यशस्वी करावे. स्पर्धेशिवाय पर्याय नाही, कठोर मेहनत करणे आवश्यक आहे. बालवयामध्ये शैक्षणिक पाया महत्त्वाचा असतो. त्यामुळे दर्जेदार शिक्षण प्रत्येक पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे. सर्वांगीण शिक्षण, ऑल राऊंडर शिक्षण देणे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गणेश शिरसाठ यांनी केले. आम्ही दगड, वीट, सिमेंट, स्टील, वाळू याच्या साह्याने शाळेच्या भिंती करतो. शाळेमध्ये जिवंतपणा येतो तो विद्यार्थ्यांच्यामुळे अशा विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याचे काम चांगलं, घडवण्याचं काम विश्वशांतीनिकेतन विद्यालयातून केले जात आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सिव्हिल इंजिनिअर गणेश आघाव यांनी केली. ऍड. गोरक्ष आव्हाड श्री. भास्कर आव्हाड श्री. राजेंद्र आव्हाड यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने अकॅडमी आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला प्रवास, घेत असलेले शिक्षण, शिक्षकांविषयी मनोगत व्यक्त केले. पालकांनी आपला अनुभव सांगितले. कौतुक सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी सहभागी होते. 75 व्या आंतरराष्ट्रीय परीक्षेसह, 15व्या राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या 80 विद्यार्थ्यांची पारितोषिक वितरण समारंभ आणि विश्वशांतीनिकेतन विद्यालयातील विविध स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह पदक आणि स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी संतोष ऑल राऊंडर अकॅडमी आणि सारा अबॅकस अकॅडमीचे डायरेक्टर डॉ. प्रवीण आघाव यांची आंतरराष्ट्रीय गणित महामंडळ, तैवानच्या वतीने भारताचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला. चाकण येथील संतोष ऑल राऊंडर अकॅडमी आणि सारा अबॅकस अकॅडमीला पूर्ण देशपातळीवर आदर्श सेंटर म्हणून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. आदर्श शिक्षक, आदर्श सेंटरसह देशपातळी प्रथम क्रमांकाची बक्षीस मिळाले. सण 4 जून 2012 पासून 6 विद्यार्थ्यांवर सुरू केलेल्या अकॅडमीमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुलाच्या बौद्धिक क्षमता वाढवणारी कोर्सेस आणि शालेयत्तर कोर्सेस यशस्वीपणे चालविले जातात. यामध्ये सुंदर हस्ताक्षर, वैदिक गणित, रुबीक क्यूब, बुद्धिबळ, संगीत, अबॅकस, मेंदू कल चाचणी, स्पोकन इंग्लिश, इंग्रजी फोनिक्स, मराठी फोनिक्स, योगा क्लासेस, ध्यान क्लासेस, पारंपरिक खेळ,-कृतीतून शिक्षण अशा पद्धतीचे शिक्षण दिले जाते. भविष्यामध्ये गुरुकुल पद्धतीचे विद्यालय सुरू करण्याचा मानस आहे असे प्रतिपादन प्राचार्या अर्चना प्रवीण आघाव यांनी केले. प्रस्ताविक डॉ. प्रवीण आघाव यांनी केले सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संतोष एरंडे यांनी केले. अकॅडमी आणि विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. अशी माहिती डॉ. प्रविण आघाव यांनी केली.
