जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरदरी या ठिकाणी खाऊ गल्ली व बाजार भरवण्यात आला होता त्यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थ यांनी शिक्षकांचे आभार व्यक्त केले

Spread the love
आज वार शनिवार दिनांक ०४/०२/२०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरदरी येथे पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा आनंद बाजार व खाऊ गल्ली कार्यक्रमांचे आयोजन मुख्याध्यापक श्री मराडे सर संदिप सस्ते सर व सर्व शिक्षकांनी केले होते.
सदर आनंद बाजार व खाऊ गल्ली आयोजित करण्यामागचा हेतू हा शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान अवगत होणे असा असून शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला सार्वजनिक जीवनात शालेय ज्ञानाचा उपयोग घेऊन व्यावहारिक कौशल्य प्राप्त व्हावे हा उद्देश त्या पाठीमागे होता.
आजच्या आनंद बाजार उपक्रमात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खाण्याच्या वस्तू व भाजीपाला शैक्षणिक साहित्य विकण्यासाठी ठेवल्या होत्या गावातील ग्रामस्थ,पालक,तरूण कार्यकर्ते,माजी विद्यार्थी यांनी बाजारास भेट देऊन वेगवेगळ्या वस्तू खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले तसेच आजच्या कार्यक्रमाला गावचे सरपंच श्री भरतशेठ तरस, उपसरपंच श्री संदिप पवार, ग्रामपंचायत सदस्या बारकाबाई गावडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश शेटे ,सुनिलराव बुचुडे, संचालक श्रीहरी सोनवणे, गणपतराव साकोरे,आप्पा शेटे,शंकर पवार,शहाजी बुचुडे, काळुराम शेटे, चंद्रकांत शेटे,व ग्रामस्थ महिला भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी भेट देऊन शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

प्रतिनिधी किशोर बोरसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents