🙏⛳️🙏⛳️🙏⛳️आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नंबर दोन या ठिकाणी शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा झाला .स्वराज्याची निशाणी चाकणचा संग्राम दुर्ग, भुईकोट किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या या किल्ल्यापर्यंत प्रभात फेरी, व वाजत गाजत शिव मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मुख्याध्यापिका कमलताई खेडकर मॅडम यांच्या नियोजनाप्रमाणे बाल सभेचे आयोजन करण्यात आले.बाल सभेचे अध्यक्ष इयत्ता सातवीची ईश्वरी धंद्रे ही विद्यार्थीनी हिने स्वीकारले. विद्यार्थिनीची उत्तम पहिली ते सातवी पर्यंतची भाषणे संपन्न झाली. त्यानंतर ज्येष्ठ शिक्षिका इंदुमती पवार मॅडम यांनी विविध प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांसमोर आपल्या भाषणातून कृतीयुक्त मांडला. मुख्याध्यापिका कमलताई खेडकर मॅडम यांनी शिवरायांचे गुण सर्वांनी अनुकरावे अशी सर्वांना प्रेरणा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत आलेले गुणवंत शिक्षक श्री.तुषार वाटेकर सर यांनी शिवगर्जना, शिवआरोळी देत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा वंदन केले.शेवटी अध्यक्ष भाषण होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवंत शिक्षक शिवव्याख्याते श्री. जितेंद्र डेरे सरांनी केले . आभार गुणवंत शिक्षका सुनंदा करोटे मॅडम यांनी मानले.
प्रतिनिधी संपादक लहु लांडे बातमीसाठी मोबाईल नंबर 9766694886 हा नंबर वर आपली बातमी पाठवू शकता