


चाकण वार्ताहर
दि. 19 फेब्रुवारी
चाकण येथील संतोष ऑल राऊंडर अकॅडमी आणि विश्वशांतीनिकेतन विद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भव्य राज्यस्तरीय किल्ला बनवा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे यंदाचे चौथे वर्ष होते. शिव प्रतिमेचे पूजन छत्रपती शिवाजी महाराज कालीन गायकवाड घराण्याचे वंशज कुरुळी गावचे श्री. संदेश गायकवाड, श्री. अजित गायकवाड, श्री. दिलीप गायकवाड कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज कालीन गायकवाड घराण्यांनी केलेले कामगिरी बद्दलची माहिती दिली. यावेळी उपस्थित गायकवाड कुटुंबियांना विद्यालयाच्या वतीने मानाचा भगवा फेटा बांधून, रेशमाची शाल आणि मांगल्याचे प्रतीक तुळशीचे रोप देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला. डॉ. प्रविण आघाव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनप्रवास आणि कार्य कर्तृत्व परिचय दिला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तर मुलींनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा परिधान केली होती. विद्यार्थ्यांनी पोवाडा, शिवगर्जना सादरीकरण केले. वकृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यासोबत किल्ले बनवा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्व सहभागी आणि विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी, पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या अर्चना प्रवीण आघाव यांनी केले. सूत्रसंचालन कविता बोडके आणि सादिया पठाण यांनी केली. अशी माहिती संस्थेचे सचिव आणि डायरेक्टर डॉ. प्रविण आघाव यांनी दिली.
प्रतिनिधी संपादक लहु लांडे बातमीसाठी मोबाईल नंबर 9766694886 हा नंबर वर आपली बातमी पाठवू शकता