आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नंबर एक या ठिकाणी शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा झाला .

Spread the love
🙏⛳️🙏⛳️🙏⛳️आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नंबर एक या ठिकाणी शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा झाला .स्वराज्याची निशाणी चाकणचा संग्राम दुर्ग, भुईकोट किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या या किल्ल्यापर्यंत प्रभात फेरी, व वाजत गाजत शिव मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मुख्याध्यापिका गारगोटे मॅडम यांच्या नियोजनाप्रमाणे बाल सभेचे आयोजन करण्यात आले.बाल सभेचे अध्यक्ष इयत्ता चौथीचा सार्थक याने स्वीकारले. पहिली ते सातवी पर्यंतची भाषणे संपन्न झाली. सर्व विध्यार्थी यांनी उत्तम भाषणे सादर केली त्यानंतर ज्येष्ठ शिक्षिका बोऱ्हाडे मॅडम यांनी विविध प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांसमोर आपल्या भाषणातून कृतीयुक्त मांडला. त्यांनी शिवरायांचे गुण सर्वांनी अनुकरावे अशी सर्वांना प्रेरणा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत आलेले गुणवत विध्यार्थी यांनी शिवगर्जना, शिवआरोळी देत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा वंदन केले आदरणीय सविता कदम मॅडम व नंदा मुंगसे मॅडम यांनी छान गाणे सादर केले तसेच मुंगसे मॅडम यांनी स्वरचित कविता सादर केली आदरणीय संतोष दौंडकर सरांनी जोशपूर्ण भाषण केले.शेवटी अध्यक्ष भाषण होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवंत शिक्षक श्री. संतोष दौंडकर सरांनी केले . आभार गुणवंत शिक्षका अलका कड मॅडम यांनी मानले.

प्रतिनिधी संपादक लहु लांडे बातमीसाठी मोबाईल नंबर 9766694886 हा नंबर वर आपली बातमी पाठवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents