

यामध्ये जल जीवन मिशन मधील पाणी पुरवठा योजना, ठाकरवाडी कडे जाणारा रस्ता आणि दशक्रिया विधी घाटाचे काम याचा समावेश आहे.
यावेळी गावातील सर्व प्रमुख ग्रामस्थांना पाणीपुरवठा योजनेचाबकमाचा तपशील सांगितला आणि सदर योजनेचे काम गुणवत्तेने करून घेण्यासाठी आपण सर्वांनी लक्ष द्यावे अशी विनंती केली.
३५ वर्षाची परंपरा सांभाळात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाला मी शुभेच्छा दिल्या.
पदाधिकाऱ्यांसह गावातील जेष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
माझ्या समवेत भाजपाचे तालुका उपाध्यक्ष सुनील देवकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय रौंधळ, बिरदवडीचे माजी सरपंच मोहन पवार, एकनाथ महाराज पवार, देशमुखवाडीचे सरपंच संजय देशमुख, संदीप देशमुख उपस्थित होते.
धन्यवाद,
अस्सल न्युज महाराष्ट्र करीता,
प्रतिनीधी,
-विकास जांभुळकर