
०४/०४/२०२३तळेगाव एमआयडीसी पो.स्टे गुन्हा रजि.नं. ७७/२०२३ ३०७, १४३ १४४, १४७ १४८, १४९, ४२७ भा.इ.का. क. ३, ४/२५ कि. लॉ. अ. अॅक्ट ३,७ मधील आरोपी अटक व तपास बाबत…..फिर्यादी श्री उदय अशोक लोंढे वय २३ वर्षे, रा. समता कॉलनी दिगंबर कुल यांचे भाडेच्या घरात वराळे ता. मावळ, जि.पुणे. हे दिनांक ३०/०३/२०२३ रोजी रात्री १०.२० वा. ते. १०:३० वा. चे दरम्यान वराळे ता. मावळ जि. पुणे. समता कॉलनीचे अंतर्गत रोडने अॅल्टो गाडीतुन जात असताना पुर्वीचे किरकोळ वादाच्या कारणावरून यातील आरोपीतांनी हातात पिस्तुल व कोयत्यासारखी हत्यारे मेवुन फिर्यादीचे अॅल्टो गाडी वर दगड मारून फिर्यादीचे पाठलाग करून फिर्यादीस जिवे ठार मारणेचे उददेशाने दोनदा पिस्तुल मधुन फायर केले व फिर्यादीने गाडी पार्क केली असता अॅल्टो कारवर दगड मारून कारचे नुकसान करून परिसरात दहशत निर्माण केली आहे वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून तळेगाव एमआयडीसी पोस्टे गुन्हा रजि.नं. ७७/२०२३ भा.द.वि.का.क. ३०७, १४३ १४४, १४७ १४८, १४९, ४२७ भा.ह.का.क. ३, ४/२५ कि. लॉ. अ. अॅक्ट ३७ प्रमाणे दिनांक ३१/०३/२०२३ रोजी गुन्हा दाखल आहे..सदर गुन्हयातील आरोपीतांचे शोध घेणे संबधाने मा. विनयकुमार चौबे सो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिचवंड, मा. मनोज लोहिया, सह पोलीस आयुक्त, मा. डॉ. संजय शिंदे सो अपर पोलीस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त परि०२ व श्री पदमाकर घनवट, सहा पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग, पिपरी चिंचवड यांचे मार्गदर्शन व सुचना प्रमाणे गुडा विरोधी पथक, पिपरी चिचवंड कडील पथकाने गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे १) अनिल जगन जाधव वय २३ वर्षे रा. शिक्षक कॉलनी वराळे ता. मावळ जि.पुणे (२) संजय ज्ञानेश्वर माळवदकर वय २४ वर्षे रा. तुमकर वाडा समता कॉलनी वराळे ता.मावळ जि.पुणे (३) कुमार सुरेश मोहिते वय २० वर्षे रा. विशाल लॉन्स जवळ वडगाव मावळ ता.मावळ जि.पुणे (४) हर्ष उर्फ सोन्या प्रमोद साठे वय १९ वर्षे रा भिमाशंकर कॉलनी वराळे ता. मावळ जि.पुणे यांना ताब्यात घेतले. सदर आरोपीतांना दिनांक ३१ /०३ /२०२३ रोजी अटक करणेत आली आहे.वरीष्ठ पोलीस निरीक्षक, रणजीत सांवत यांचे मार्गदर्शन व सुचना प्रमाणे पोलीस ठाणेकडील गुन्हे तपास शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी गुन्हयातील उर्वरीत पाहीजे आरोपीचे तांत्रीक विश्लेषण व ठाव ठिकाणा बाबत मिळाले माहीती प्रमाणे सुदवडी भंडारा डोरातील झाडीत सापळा रचुन आरोपी नामे (५) विकास उर्फ बापु विष्णु रेठे वय २८ वर्षे रा. दत्तनगरी वडगाव मावळ ता. मावळ जि.पुणे व विधीसंघर्षीत बालक नामे (६) रोहन उर्फ विक्या उत्तम शिंदे वय १७ वर्षे ३ महिने रा. वतननगर तळेगाव दाभाडे ता.मावळ जि.पुणे (3) राज उर्फ बारकु प्रमोद साठे वय १७ वर्षे ०८ महिने रा. भिमाशंकर कॉलनी वराळे मावळ ता. मावळ जि.पुणे यांना दिनांक ०३/०४/२०२३ रोजी अटक करणेत आली आहे.वरील नमुद अटक आरोपी कडुन गुन्हयात वापरले देशी बनावटीचे पिस्टल, कोयते, लाकडी दांडके व गुन्हयात वापरलेल्या दोन मोटार सायकली जप्त करणेत आल्या आहेत. गुन्हयातील आरोपी विरूद्ध यापुर्वी वडगाव पो.स्टे. तळेगाव दाभाडे पोस्टे, हिंजवडी पो.स्टे व तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, बेकायदेशीर पणे शस्त्रे बाळगण्याचे गुन्हे दाखल आहेत..वरीष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास व गुन्हयातील आरोपी अटक करणे कामी रणजीत सांवत, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सपोनि मनोजकुमार पांडे, पोउनि. पी. पी. आहिरे, पो.ना… १३६८, सुरेश जाधव, पो. ना. १०६७, डी.के. सातकर, पो.कॉ. २५९१, सचिन नांगरे तळेगाव एमआय डीसी पो.स्टे तसेच सपोनिरी एच व्ही माने, गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा पिपरी चिचवंड व त्यांचे पोलीस अंमलदार यांनी मिळुन कामगीरी केली आहे..(डॉ. काकासाहेब डोळे)पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०२ पिंपरी चिंचवड शहर
प्रतिनिधी संपादक लहू लांडे 8007686970