


फोर्ज मार्शल कंपनी.संचेती हास्पिटल पुणे व ग्रामपंचायत कडुस खेड यांच्या संयुक्त विद्यमाने हाडांचे शिबीर संपन्न ..
फोर्ज मार्शल कंपनी, संचेती हॉस्पिटल पुणे व ग्रामपंचायत कडुस खेड यांच्या संयुक्त विद्यमानने दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 ते 3.30 या वेळात पांडूरंग मंदिर कडुस या ठिकाणी ओर्थोपेडिक (हाडांचे) आजाराचे मोफत तपासणी शिबिर पार पडले.
अशा प्रकारचे शिबिर राबविण्यामागचे मुख्य कारण म्हणजे कडुस व जवळपासच्या गावातील लोकांना ओर्थोपेडिक आजारावर औषध उपचाराची व फिजिओथेरपीची सोय व्हावी यासाठी फोर्ज मार्शल कंपनीच्या वतीने हे शिबिर घेण्यात आले.
या शिबिरामधे एकुण 320 पेशंटचे नोदणी झाली. त्याबरोबर या पेशंटची ओर्थोपेडिक डॉक्टराच्या माध्यमातून सांधेदुखी, संधीवात, हाता पायाना मुंग्या येणे, फ्रोझन शोल्डर, मणक्यांचे जुने आजार, सायटिका पेन, लिंगामेन्ट इन्जुरी याची तपासणी करण्यात आली. या व्यतिरिक्त 64 लोकांची नोंदणी करुन घेण्यात आली. ओर्थोपेडिक डॉक्टरांची OPD ही इथुन पुढे दर बुधवारी फोर्ज मार्शल कंपनी गेट नंबर 4 सावरदरी या ठिकाणी चालू राहणार आहे. या शिबिराचे उदघाटन संचेती हॉस्पिटलचे डॉ श्री राहुल चौबे, डॉ शेंडे (ओर्थोपेडिक विभाग प्रमुख) व त्यांची टीम, फोर्ब्स मार्शल समाज विकास विभाग प्रमुख श्रीमती बीना जोशी, स्वप्नील हुंबरे वेलफेअर ऑफिसर ( कार्यक्रम समन्वयक), डॉ बनसोड ( फोर्ज मार्शल शेहेरनाज मेडिकेअर सेंटर), पांडूरंग मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अमित गोडसे, व स्थानिक ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळेस फोर्ज मार्शल कंपनीचे स्वयंसेवक उमा तिवारी, रुतुजा चाफेकर, रिया सायमन, निखिल पंडीत, प्रदिप शेलार, ऋषीकेश धुमाळ, दिनेश बधाले याचबरोबर गर्ल्स Scholarship प्रकल्पातील काही स्वयंसेवक पुर्णवेळ उपस्थीत होते. शिबिराची माहिती स्वप्निल हुंबरे व बीना जोशी यानी उदघाटन प्रसंगी दिली. ग्रामपंचायत कडुस सरपंच श्रीमती शेहनाज तुरुक, उपसरपंच श्री अनिकेत धायबर, डॉ दिपक गोरे – (फोर्ज मार्शल शेहेरनाज मेडिकेअर सेंटर विभाग प्रमुख), महेश शेटे मेडिकल ऑफिसर यानी कार्यक्रमास्थळी भेट दिली.
अस्सल न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी डॉक्टर ओव्हाळ