

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नव्याने उभारलेल्या स्मारकास पुढील सुशोभीकरणाकरिता आणखी भरघोस निधी देणार … आमदार दिलीपराव मोहिते पाटील
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त राजगुरुनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती खेड यांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी नऊ वाजता खेड तालुका बौद्ध महासभेच्या वतीने बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सलामी देऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, नायब तहसीलदार मदन जोगदंड , पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे , राजगुरुनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ , सौ. निवेदिता घारगे , खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलासराव सांडभोर पाटील, राजगुरुनगरचे माजी सरपंच शांताराम घुमटकर आदी मान्यवर व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार दिलीप मोहिते म्हणाले, " बऱ्याच वर्षापासून जीर्णअवस्थेत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगुरुनगर येथील स्मारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र राज्य शासन व राजगुरुनगर नगर परिषदेच्या माध्यमातून आज भव्य दिव्य स्वरूपात सुशोभीकरण करून सर्व जनते करता खुले करण्यात आले आहे. या नव्याने उभारलेल्या स्मारकास पुढील सुशोभीकरणाकरता आणखी भरघोस निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार मोहिते यांनी सांगितले.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष अशोक कडलक , उपाध्यक्ष कैलास केदारी , पि.के. पवार, कार्याध्यक्ष संतोष डोळस, सचिव विद्याधर साळवे ,सदस्य विजय घेगडमल, लक्ष्मण खंडागळे, आत्माराम रोकडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.
यावेळी दिवसभर नागरिकांनी अभिवादनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आरपीआय युवा आघाडीचे अध्यक्ष कैलास केदारी, भाजपा खेड तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, जि.प. सदस्य अतुल देशमुख , हिरामण अण्णा सातकर, भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस,अलका जोगदंड ,बाबासाहेब हजारे आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी पुणे जिल्हा रोशनाताई घुमटकर9730833189