

चाकण आळंदी घाटात एक बैल खुप दिवसांपासून फिरत होता त्या बैलाचा डावा डोळा फुटलेला होता खुप लोकांनी त्याला पकडायचा प्रयत्न केला पण कोणालाही भेटत नव्हता श्री माऊली गोशाळा ट्रस्ट बिरदवडी चाकण या गोशाळा ट्रस्ट ने मागच्या महिन्यात मीटिंग बोलावली होती या बैलाला पकडण्यासाठी आणि आज गोशाळा टीम यशस्वी झाली खरंच या बैलाला पकडल्यानंतर खुप आनंद झाला उद्या या बैलाचे ऑपरेशन करण्यासाठी डॉ बोलावले आहे
प्रतिनिधी राहुल देशमुख