
शिक्रापूर मधुन बावीस वर्षीय युवती बेपत्ता
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर )येथील बावीस वर्षीय युवती घरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली असल्याने युवती च्या वडिलांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे.
शिक्रापूर येथील वाव्हळ हॉस्पिटल परिसरात राहणारी श्रुती कांबळे या युवतीचे वडील कामाला गेले असताना श्रुती चा घरात मोबाईल वरून भावा संग वाद झाला होता. त्यानंतर रात्री घरात झोपले असताना सकाळच्या सुमारास श्रुती दिसुन आली नाही.त्यामुळे तिचा सर्वत्र शोध घेतला नातेवाईक यांच्याकडे पण शोध घेतला मात्र ती कुठेच मिळून नाही आली.त्यामुळे लक्ष्मण रामनाथ कांबळे वय 51 वर्ष रा.शिक्रापूर ता.शिरूर जि.पुणे मुळ रा. परळी वैजनाथ ता.परळी जि.बीड यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे.
बेपत्ता झालेल्या श्रुती चे वर्णन खालीलप्रमाणे.
रंग सावळा,केस काळे, उंची चार फुट पाच इंच,अंगात गुलाबी टी-शर्ट, काळी पॅन्ट, असे वर्णन असुन कोणासही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी 8600420795 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड करीत आहे.
कु.सचिन संजय दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432/ 7350559916