- अनंत बिरादार यांना निसर्गोपचार भूषण पुरस्कार
पालकमंत्र्यांनी दिला निसर्गोपचार भूषण पुरस्कार

पुणे : राष्ट्रीय स्तरावर निसर्गोपचार विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार तसेच सर्वांगीण विका व्हावा यासाठी तीन दशकांपासून उत्कृष्ठ कार्य करत असलेले इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनाजेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री. अनंत बिरादार यांना आदरणीय श्री. चंद्रकात दादा पाटिल, उच्च शिक्षण मंत्री, महाराष्ट्र सरकार यांच्या शुभ हस्ते “निसर्गोपचार भूषण पुरस्कार-200” प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार हृदय मित्र फाउंडेशन तर्फे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी (बापू भवन), आयुष मंत्रालय, भारत सरकार, पुणे येथे आयोजित केला गेला. निसर्गोपचार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलेले श्री. अनंत बिरादार आपल्या भाषणात म्हणाले की, आधुनिक चिकित्सा पद्धती हि व्यक्ती आजरी पडल्यानंतर महत्त्वाची ठरते परंतु निसर्गोपचार (नॅचरोपॅथी) ही चिकित्सा पद्धती व्यक्तीला निरोगी आरोग्यवर्धक) ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.
दैनंदिन जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या सामान्य आजारांच्या उपचारात योग- नॅचरोपॅथीचे महत्त्वाचे योगदान आहे. म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारने त्यांच्या आरोग्याच्या बजेटपैकी किमान 5% योग- निसर्गोपचारावर खर्च करावा. त्यामुळे देश-राज्य एकत्र कुटुंबाचे आरोग्य बजेट शून्य होवू शकते..
महाराष्ट्राला अधिक चांगले आणि आरोग्यदायी बनवायचे असेल तर राज्यात योग- निसर्गोपचाराला चालना द्यावीच लागेल. डॉ. अनंत बिरादार यांनी राज्य सरकारला आग्रह केला की, 2017 मध्ये बनवला गेलेला महाराष्ट्र योग- नॅचरोपॅथी कायदा महाराष्ट्रामध्ये लवकर लागू करावा तसेच त्यांनी पुणे (कोंडवा) येथे निसर्ग-ग्राम केंद्र लवकरात लवकर चालू करावे, असे आवाहन केले.. कारण सरकारने बांधलेल्या 200 खाटांच्या नॅचरोपॅथी हॉस्पिटलचे (निसर्ग-ग्राम) उद्घाटन व त्याचे लोकार्पण करणे आवश्यक आहे, ज्यामुळे निसर्गोपचार चिकित्सा पद्धतीला अधिक बळकटी प्राप्त होईल. राष्ट्रीय आयुष मिशन (NAM) अंतर्गत, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हरियाणा सरकारच्या धर्तीवर 21 योग-निसर्गोपचार केंद्र सुरू करण्याची विनंती करण्यात आली. पुढे बोलताना ते म्हणाले की, आजारपणातून निरोगीपणाकडे (ILLNESS कडून WELLNESS कडे) जाण्यासाठी 7
अभ्यासक्रमात आयुष चिकित्सा पद्धतीचा सामावेश करणे तसेच त्याचा प्रचार प्रसार करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री चंद्रकात दादा पाटिल म्हणाले की, केवळ औषधी चिकित्सा पद्धती महत्वाची नसून निसर्गोपचार पद्धती पण तितकीच महत्वाची आहे. कोरोना काळात निसर्गोपचाराची आवश्यकता किती होती हे त्यांनी त्यांच्या भाषणातून उपस्थित लोकांना सांगितली तसेच डॉ. अनंत बिरादार यांना निसर्गोपचार भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या पाहुण्या डॉ. सत्यलक्ष्मी, संचालिका, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी (बापू भवन), आयुष आयुष मंत्रालय, भारत सरकार, पुणे यांनी निसर्गोपचार भूषण पुरस्कार प्राप्त बिरादार यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, माननीय श्री. चंद्रकांत पाटील यांच्या सहयोगानेच आम्ही कोंडवा येथे 25 एकर जमीन अधिग्रहित केली तसेच डॉ. सत्यलक्ष्मी यांनी श्री. चंद्रकांत दादा पाटिल यांना भविष्यात योग व निसर्गोपचाराच्या सर्वांगीण विकासासाठी नॅचरोपॅथी परिषदेची स्थापन करावी हि विनंती केली.
विशेष अतिथी श्री. योगेश अण्णा टिळेकर यांनी निसर्गोपचार पद्धती घरा-घरात पोहोंचण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे संयोजक, हृदय मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. श्रीकांत मुंदडा यांनी संस्थेतर्फे मधुमेह, कार्डियाक मधील समस्यावर निसर्गोपचार, आयुर्वेद चिकित्सा पद्धतीव्दारे करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि श्री. लाहोटी यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले.
प्रतिनिधी: रामचंद्र पाटील