
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चेन स्नॅचिंग, वाहन चोरी, मोबाईल चोरी, घरफोडीचे गुन्हयास प्रतिबंध व्हावा व गुन्हे उघडकीस आणावेत याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे खंडणी विरोधी पथकाकडील स्टाफमार्फत रावेत पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १९० / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ या गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना, सदर गुन्हयाचे प्राप्त सीसीटीव्ही फुटेज तसेच पोहवा प्रदीप गोडांबे व पोना आशिष बोटके यांना मिळालेल्या माहिती वरुन सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार रामा पाटील व पांडा सुतार यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपींबाबत माहिती घेत असतांना पांडा सुतार हा लातूर येथे असल्याचे समजल्याने, खंडणी विरोधी पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, पोहवा प्रदीप गोडांबे व पोना आशिष बोटके यांनी लातूर येथे जावुन शोध घेतला असता प्रदीप उर्फ पांडुरंग लहु सुतार वय ३२ वर्षे रा. बी २९, गजानननगर, रहाटणी, काळेवाडी फाटा पुणे हा न्यू रेल्वे स्टेशन रोड, लातुर येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन, त्याचेकडे विचारपुस करता, त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार रामा पाटील याचेसह केल्याची तोंडी कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही कामी रावेत पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास रावेत पोलीस स्टेशन हे करत आहे.

आरोपी प्रदीप उर्फ पांडुरंग लहु सुतार हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन, त्याचे विरुध्द दरोडा, जबरी चोरी, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, गंभीर दुखापत व वाहनचोरीचे असे एकुण ०७ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा.डॉ.संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. श्रीकांत दिसले, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा.पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सुनिल कानगुडे, प्रदीप गोडांबे व आशिष बोटके, यांचे पथकाने केली आहे.
( स्वप्ना गोरे) पोलीस उपआयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे
8007686970