

खेड सेझ बाधित शेतकऱ्यांनी केले मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे सेझचे प्रश्न मार्गी लावण्यातील मदती संदर्भात अभिनंदन!”
खेड सेझ प्रकल्प २००८ मध्ये अस्तित्वात आला. १७ गावांतील जमिनीची संपादन यासाठी होणार होते. परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे फक्त ५ गावातील जमिनीचे संपादन झाले.
या प्रकल्पांअतर्गत जमीन संपादित गावान व्यतिरिक्त उर्वरित गावांमधील शेत जमिनीवरील टाकलेले शिक्के काढणे आणि सेझ साठी संपादित गावांमधील १५%टक्के परतावा असे प्रमुख प्रश्न निर्माण झाले होते. व हे दोन्हीही प्रश्न प्रदीर्घ प्रलंबित असे होते.
या प्रश्नांसंदर्भात मा.खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शेतकरी हिताची भूमिका घेऊन वारंवार शासन दरबारी मुख्यमंत्री, उद्योग मंत्री, यांच्याकडे पाठपुरावा केला.
दिनांक १३ सप्टेंबर२०२२ रोजी राज्याचे उद्योग मंत्री, मा. उदयजी सामंत यांच्याबरोबर संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लावून या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले.
व त्याचे फलित म्हणून सेझ अंतर्गत टाकण्यात आलेले शिक्के काढण्याचा निर्णय झाला व त्याची कार्यवाही देखील झाली.
तसेच १५% परतावा प्रश्न संदर्भात सुद्धा वारंवार पाठपुरावा केल्यामुळे शासनामार्फत (एम.आय.डी.सी.) अंतर्गत खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीची परताव्याच्या जमीनीचे मूल्यांकन करून शेतकऱ्यांना शासनामार्फतच मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा लवकरच परताव्याचा चांगला मोबदला मिळणार आहे.
सेझ अंतर्गत टाकलेले शिक्के काढणे, व शेतकऱ्याचा १५% टक्के परतावा प्रश्न यासंदर्भात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेल्या मदतीसाठी/पाठपुराव्यासाठी त्यांचे सेझ बाधितत शेतकऱ्यांच्या वतीने रविवार दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी लांडेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे बुके देऊन अभिनंदन करण्यात आले. व यापुढे १५%परतावा प्रश्न मिटेपर्यंत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाठपुरावा करण्याचे विनम्र आव्हान सेझ बाधित शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना करण्यात आले.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अभिनंदन करण्यासाठी कनेरसर, केंदूर, दावडी, गोसासी, निमगाव येथील शेतकरी प्रतिनिधी मा. आनंदरावजी हजारे (शिवसेना ,पुणे जिल्हा संघटक) मा काशिनाथ हजारे, मा. अभिजीत साकोरे, मा. मारुतराव गोरडे, मा. निलेश म्हसाडे, ओंकार कान्हुरकर, मा. गुलाबराव हजारे, मा. सहदेव हजारे, प्रा. डॉ. बाळासाहेब हे उपस्थित होते.
मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी १५% टक्के परतावा प्रश्न संदर्भात उद्योग मंत्र्यांबरोबर यापुढे उर्वरित पाठपुरावा करून लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन