

पुणे- १ मे – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” “संकल्प निरोगी महाराष्ट्राचा” मा. ना. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री महोदय यांचे शुभहस्ते ऑनलाईन प्रणाली द्वारे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडला.
पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्याच्या वतीने साळुंके आळी, समाज मंदिर, चाकण येथे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, चाकण नगरपालिका मुख्य अधिकारी श्री सुनील बल्लाळ, पुणे डी पी सी सदस्य मा भगवान पोखरकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, उपमुख्य अधिकारी श्री राजेंद्र पांढरपट्टे, माजी उपनगराध्यक्ष श्री धीरज मुटके, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष मोबीन काझी, शिवसेना उपशहर प्रमुख श्री शेखर पिंगळे, माजी ग्रामपंचायत सदस्य चाकण श्री पांडुरंग गोरे आणि वरिष्ठ सहाय्यक श्री विजय भोंडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सदर कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली .
-बाह्य रुग्ण सेवा
-मोफत औषधोपचार
-मोफत प्रयोगशाळा तपासणी
-टेलीकन्सल्टेशन
-गर्भवती मातांची तपासणी
-लसीकरण मानसिक आरोग्य समुपदेशन
-महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी
-एच एल एल रक्त तपासणी सुविधा
-आवश्यकतेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा
इत्यादी सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
प्रतिनिधी संपादक लहू लांडे