हजारो लोकांच्या उपस्थिती मध्ये बैलांचा दशक्रिया विधी पार पडला.

Spread the love

हजारो लोकांच्या उपस्थिती मध्ये बैलांचा दशक्रिया विधी पार पडला.

शिरूर : शिरूर शेजारील गव्हाणेवाडी येथील श्री.पांडुरंगशेठ किसनराव काळे हे जुने गाडामालक असुन संपुर्ण पुणे नगर जिल्ह्यात नावाजलेले प्रसिद्ध गाडामालक आहे.आजपर्यंत त्यांना महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, सह्याद्री केसरी तसेच प्रत्येक घाटात घाटाचा राजा व 1 नंबर ची फायनल मारली आहे त्यांच्या दावणीला दहा बैल आहे.पोटच्या पोराप्रमाणे ते आपल्या बैलांना जपीत असतात. गेल्या काही दिवसात त्यांच्या दोन बैलांचे दुःखद निधन झाले होते त्यामुळे काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
ज्या बैलाने श्री.पांडुरंग किसन काळे ( गव्हाणवाडी) या नावाची आणि गावाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात करुन दिली.ज्या बैलाने सात तालुक्याला दाखवून दिलं की निलेशदादा काळे कोण आहे अशा सलग २१ घाट रेकॉर्डब्रेक घाटाचा राजा लाडका हिंदकेसरी चेअरमन व बैलगाडा क्षेत्रात दहशत किंग या नावाने ओळखला जाणारा हिंदकेसरी पंडित यांचे दुःखद निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे संपुर्ण पुणे नगर जिल्हा बैलगाडा क्षेत्रावर शोकाकळ पसरली होती.
चालु आठ दिवसात काळे कुटुंबाचे दोन हुकमाचे बैल गेले त्यामुळे काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. काळे कुटुंबांनी त्यांना आपल्या घरातील सदस्य प्रमाणे जपले होते.
पंडित म्हणल कि दहशतकिंग पट्यावाला बैल,आणि चेरमन म्हणलं कि सलग 21 घाटाचा राजा चा मानकरी असणारा बैल अशी बैलांची ओळख ओळख होती.
दि. 4 मे ला बैलांचा दशक्रिया विधी हजारो लोकांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. तर प्रवचनकार ह.भ.प.श्री.संतोष महाराज कोठाळे यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर हजारो लोकांच्या उपस्थिती ने बैलांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली व त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम पार पडला.
शेतकरी हा आपल्या मुक्या प्राण्यांना किती पोटच्या पोरासारखा जीव लाऊ शकतो त्याच उत्तम उदाहरण काळे कुटुंबांनी दाखवून दिले आहे.

कु.सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
+91 7350559916 /+91 8767358432

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents