

१९/०४/२०२३
आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्यांना अटक खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांची कारवाई
मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात आयपीएल क्रिकेट मॉवर बेटींग जुगार चालविणाऱ्यांची माहिती काढुन कारवाई करणे बाबत दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अरविंद पवार व अंमलदार तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस नाईक शैलेश मगर यांना मिळालेल्या बातमीवरून, लेक पॅराडाईज सोसायटी, रो हाऊस नं. ४४ तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि.पुणे याठिकाणी छापा घालुन इसम नामे १) रोमी सुरेश नेहलानी वय ३६ वर्षे रा. एचबी २८/१ दिप मोटर्स समोर, वैष्णव माता मंदीराजवळ, पिंपरी, पुणे २) विनोद राजु सतिजा वय ३२ वर्षे रा. सुखवाणी किस्टल, सी / ७०१, पिंपरीगाव, पुणे ३) लखन राजु गुरुबानी, वय २४ वर्षे रा. आयप्पा मंदीराजवळ, आयप्पा कृपा बिल्डिंग, फ्लॅट नं. २, पिंपरी, पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन क्रिकेट बेटींग करीता वापरत असलेले ०७ मोबाईल फोन, एक लॅपटॉप, ०५ वह्या, ०२ पेन व ४,५००/- रुपये रोख रक्कम असा एकुण ९६.७८५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन, त्यांचे विरुध्द तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २१४ / २०२३ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५, इंडियन टेलीग्रॅम अॅक्ट कलम २५ (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उध्दव आर. खाडे हे करत आहेत.
सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. मनोज लोहीया, सह पोलीस आयुक्त, मा. डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस अंमलदार सुनिल कानगुडे, निशांत काळे, किरण काटकर, विजय नलगे, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, प्रदीप गुट्टे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहवा नागेश माळी यांनी केली आहे.
(स्वप्ना गोरे) पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे
8007686970