


धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमीत्त मावळा ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजीत किल्ले संग्राम दुर्ग चाकण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले मावळा ग्रुप चे अध्यक्ष विजेंद्र (अण्णासाहेब) बुर्डे, प्रकाश नायकवडी जगन आल्हाट मनोज ओसवाल प्रविण शेट हुलावळे या सर्वांनी स्वच्छ्ता मोहीम राबवण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन केले असता या कार्यक्रमांची दखल घेऊन महाराणा प्रतापसिंह प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीकांत दादा परदेशी, दत्ता शेट परदेशी वादळ ग्रुप चे अध्यक्ष बाळा भाऊ पवार ,रेश्मा ताई देशमुख कबड्डी क्रीडा मंडळ चे अध्यक्ष संतोष दादा साकोरे यांनी एकत्र येऊन किल्ले संग्राम दुर्ग येथे किल्ला स्वच्छ्ता मोहीम राबवण्यात आली सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजे पर्यंत मोहीम राबवण्यात आली त्या नंतर 2 ते 3 या वेळेत शिववंदना घेण्यात आली आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे गणेश नाणेकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले हिंदवी स्वराज्य ग्रुप चे अध्यक्ष गणेश शेट गवळी यांनी ही कार्यक्रमाला उपस्थिती दाखविली किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान यांनी मोलाचे सहकार्य केले आणि 3 ते 5 या वेळेत चाकण येथील बिरदवडी गावात श्री माऊली गोशाळा ट्रस्ट या ठिकाणी जाऊन 186 गाईंना सेवा देण्यात आली माऊली गोशाळा येथे चारा देणारे अन्नदाते हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशन यांच्याकडून या गाईंना चारा देण्यात आला विशेष म्हणजे या गाई कत्तलीपासून वाचाविलेल्या आहे या गोशाळा ट्रस्ट येथे रोड एक्सीडेंट झालेल्या तर काही अपंग गाई तसेच शेतकऱ्यांनी सोडलेल्या भाकड गाई या सर्व जनावरांचा सांभाळ ही श्री माऊली गोशाळा ट्रस्ट करत आहे या गोशाळा ट्रस्ट ला समाजाच्या मदतीची खुप गरज आहे आम्ही सर्व जण आपल्याला आव्हान करू इच्छितो की आपण सर्वांनी या श्री माऊली गोशाळा ट्रस्ट ला मदतीचा हातभार लावावा
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9370612656