शिरुर पोलिसांकडून काही तासात आरोपीला बेड्या

Spread the love

शिक्रापूर प्रतिनिधी : शिरुर शहरात चक्क एका परप्रांतिय युवकाने चक्क सहा वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली असताना पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला शिरुर पोलिसांच्या पथकाने काही तासात बेड्या ठोकत अटक केली असून पाचू हादरा असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिरुर शहरात राहणारी महिला सायंकाळच्या सुमारास घरात स्वयंपाक करत असताना तिची सहा वर्षीय बालिका घराबाहेर खेळत होती, दरम्यान पाचू हादरा याने बालिकेला बाजूच्या खोलीत घेऊन जात तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला यावेळी बालिकेच्या ओरडण्याचा आवाज आल्याने तिची आई शेजारील घराकडे पळत गेली असता तिला आपल्या बालिकेवर पाचू हादरा अत्याचार करत असल्याने दिले यावेळी बालिकेच्या आईने आरडओरडा केल्याने आरोपी पाचू हा पळून गेला, याबाबत पिडीत बालिकेच्या आईने शिरुर पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार सांगत तक्रार दाखल केली, तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी आरोपी परप्रांतिय असल्याने पळून जाऊ शकतो अशा संशयातून तातडीने पोलिसांचे दोन पथक नेमून अहमदनगर व पुणे रेल्वे स्टेशन येथे रवाना केले, मात्र सदर ठिकाणी आरोपी मिळून आला नाही त्यांनतर सकाळच्या सुमारास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील, पोलीस नाईक नाथा जगताप, संपत खबाले, पोलीस शिपाई रघुनाथ हळनोर, नितेश थोरात यांनी शिरुर शहरात शोध मोहीम राबवत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पाचू हादरा रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांना शिताफीने ताब्यात घेत अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील या करत आहे.

कु.सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
7350559916 / 8767358432

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents