

पुणे खेड
महाराष्ट्र शासनाने महिला व बाल विकास विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार दिनांक 31 मे रोजी संयुक्त ग्रामपंचायत सुरकुंडी माजगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडला महिलांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल व सामाजिक कार्याचे दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रसंगी सुरकुंडी माजगाव ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच सौ कल्पनाताई लोखंडे उपसरपंच प्रदीप पऱ्हाड तसेच ग्रामसेविका विशाखा ताई फुलपगार ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर शेठ पऱ्हाड सुरेश शेठ पऱ्हाड सीमा पराड मंजुळा बोगटे चतुरा लोखंडे राज्यश्री कडलक कृषी अधिकारी शरद इंदोरे तसेच मयूर लोखंडे अमित कडलक ओव्हाळ गुरुजी सुपे गुरुजी महेश कडलग शंकर वाजे शिपाई माजी सरपंच शैलेंद्र पराड बबन वाजे पीएसआय अंगणवाडी सेविका मनिषा कडलग गंगुबाई ओव्हाळ नवनाथ कडलग तसेच सेवानिवृत्त शिवराम सुपे यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेविका सौ विशाखा ताई फुलपगर यांनी केले व आभार उपसरपंच प्रदीप पऱ्हाड व ज्ञानेश्वर शेठ पराड यांनी केले
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886