

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नगरपरिषद चाकणचे मुख्यधिकारी श्री. सुनील बल्लाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषेदेच्या सभागृहात जागतिक पर्यावरण दिन निमित्त नगरपरिषद चाकण व विद्याव्हँली इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनातील समस्या व त्यावर शासन निर्देशानुसार चाकण नगरपरिषदे मार्फत केल्या जात असलेल्या उपयोजना इत्यादी बाबत जनजागृती व विद्याव्हँली इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यां करीता व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी विद्याव्हँली स्कूलचे श्री. शामराव देशमुख (अध्यक्ष विद्याव्हॅली स्कूल),श्रीमती. रोहिणी देशमुख (सचिव विद्याव्हॅली स्कूल), श्रीमती.मोनाली नलावरे (समन्वयक विद्याव्हॅली स्कूल),श्रीमती.वंदना सरनाईक, (समन्वयक विद्याव्हॅली स्कूल),श्रीमती.दीपक शिंदे (प्रिन्सिपल विद्यानिकेतन) व नगरपरिषद चे उपमुख्याधिकारी श्री. राजेंद्र पांढरपट्टे, श्रीमती. कविता पाटील (पर्यवेक्षक, पा. पु. व स्वच्छता) श्री. विजय भोंडवे ( लिपिक आरोग्य विभाग),श्री. विजय भोसले, श्रीमती मंगल गायकवाड (मुकादम चाकण नगरपरिषद), श्री. अभय मेंढे (समन्वयक चाकण नगरपरिषद) इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम दरम्यान विद्याव्हॅली स्कूलचे विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले व नोडल ऑफिसर श्रीमती. कविता पाटील मॅडम यांनी पर्यावरण संवर्धन विषयावर व्याख्यान दिले व श्री. शामराव देशमुख यांनी व उपमुख्याधिकारी श्री. राजेंद्र पांढरपट्टे, यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्लास्टिक कचरा मॅनेजमेंट बाबत आव्हान केले
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9370612656