
दिनांक 06/06/2023 रोजी चाकण पोलीस स्टेशन गुरनं 1678/2022 भा द वि कलम 307,452, 324, 323, 427, 504,506, 34 सह आर्म ऍक्ट 4, 25 व मोक्का कायदा कलम 3(1)(¡¡), 3, 4 प्रमाणे गुन्ह्यातील सुमारे पाच महिन्या पासून पाहिजे आरोपी सत्यम दत्तात्रय कड वय 23 वर्ष,रा. कडाचीवाडी ता खेड जि पुणे यास चाकण पोलीस स्टेशन कडील डी.बी. पथकाचे सपोनि विक्रम गायकवाड, पो ना हनुमंत कांबळे, पो शि सुनील भागवत यांनी गोपनीय माहिती प्राप्त करून मरकळ ता खेड जि पुणे येथून शिताफिने ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न गर्दी मारामारी अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत तसेच सदर आरोपीने फरार कालावधीमध्ये चाकण पो स्टे व माळुंगे MIDC पो स्टे हद्दीत खालील प्रमाणे गुन्हे केलेले आहेत.
चाकण पो स्टे हद्दीत
1) गुरनं 462/2023 भा द वि कलम 376 (2)(N), 323, 504, 506 प्रमाणे
2)गुरनं 436/2023भा द वि कलम 392, 34 आर्म ऍक्ट 3/25 प्रमाणे
तसेच म्हाळुंगे एमआयडीसी पो स्टे
3) गुरनं 252/2023 भादवी क 394,34 आर्म ऍक्ट 3/25 प्रमाणे
4)गुरनं 255/2023 भादवी क 394,34 आर्म ऍक्ट 3/25 प्रमाणे
असे एकूण चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत . सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.सहा. पोलीस आयुक्त सो,चाकण विभाग
राजेंद्र गौर सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग पिंपरी चिंचवड करीत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
चाकण पोलीस स्टेशन
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे