
दिनांक ०७/०६/२०२३
खंडणी विरोधी पथकाची कारवाई
रेकॉर्डवरील गुन्हेगार व त्याच्या साथीदारास ०२ पिस्टल, ०१ छऱ्याची गन व ०२ जिवंत काडतुसासह अटक
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगुन गुन्हा करणारे गुन्हेगारांविरुध्द विशेष मोहिम राबवुन कारवाई करणेबाबत मा. पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या आदेशान्वये, दिनांक ०६/०६/२०२३ रोजी खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढत असतांना पोलीस अंमलदार गणेश गिरीगोसावी व विजय नलगे यांना मिळालेल्या बातमीवरून, रेकॉर्डवरील गुन्हेगार १) रोहीत संतोष जाधव वय २४ वर्षे रा. पाटील प्लाझा, नांडेदगाव ग्राम पंचायत शाळा, नांडेदसिटी, सिंहगडरोड, पुणे २) आदित्य बापु शिंदे वय २३ रा. बीजेएस कॉलेज शेजारी, बकोरी रोड, वाघोली, पुणे यांना सुलोचना सिटी समोरील मोकळ्या मैदानात, पत्र्याचे शेडजवळ, पिंपळे निलख, पुणे येथुन ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन किं. रु ८२,९००/- रु. किंमतचे ०२ देशी बनावटीचे पिस्टल, ०१ छऱ्याची गन व ०२ जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त करण्यात आले असुन, त्याचे विरुध्द सांगवी पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर २६८ / २०२३ आर्म अॅक्ट कलम ३ (२५). महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे पोहवा ७०५ निशांत काळे हे करीत आहेत.
अटक आरोपी रोहीत संतोष जाधव हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन, त्याचे विरुध्द वाकड पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्नचा गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, मा. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मा. सतिश माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, तसेच खंडणी विरोधी पथकाचे सहा. पोलीस उप-निरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार गणेश गिरीगोसावी, विजय नलगे, रमेश गायकवाड, निशांत काळे, प्रदीप गोडांबे, किरण काटकर, आशिष बोटके व सुधीर डोळस यांचे पथकाने केली आहे..
( स्वप्ना गोरे) पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड