
खबरी जबाब ता.०६/०६/२०२३
माझे नाव सागर नाना पाटील वय २८ वर्षे, धंदा-वाहन चालक सूर्या हॉस्पीटलच्या पाठीमागे अनिल गोसावी यांचे खोलीत मुटकेवाडी ता. खेड, जि.पूणे मोबा नंबर ९६६५५९९७४३ असे असून चाकण पोलीस ठाण्यात समक्ष हजर राहून माझे ताब्यातील पिक अप टेम्पो नंबर MH-14-EM-1383 हा चोरीला गेल्याबाबत तकार देतो की,
मी वरील ठिकाणी माझी बहीण गायत्री नाना पाटील वय २१ वर्षे हिच्यासह राहण्यास असून आमचे मुळ गाव शिरसगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव असे आहे. मी मागील महिन्यापासून माझे गावाकडील मित्र फिरोज शहाबुद्दीन शेख याचे मालकीचा पिक अप टेम्पो नंबर MH-14-EM-1383 हा भाडयाने चालविण्यास घेतला होता. त्याप्रमाणे मी सदरचा टेम्पो सूर्य नाटो कंपनीत भाडेतत्वार लावला होता व तो मी स्वतः चालवित होतो. रात्रीच्यावेळी सदरचा टेम्पो मी नेहमीप्रमाणे सूर्या हॉस्पीटलच्या समोर पार्क करून ठेवायचो..
दि.०५/०६/२०२३ रोजी रात्री ८:०० वाजणेच्या सुमारास मी माझे ताब्यातील टेम्पो सूर्या हॉस्पीटल समोर पार्क करून ठेवला होता. दूसरे दिवशी दि.०६/०६/२०२३ रोजी सकाळी ८:०० वाजणेच्या सुमारास मी माझा टेम्पो घेण्यासाठी सदर ठिकाणी गेला असता माझा पार्क केलेला टेम्पो मला जागेवर दिसला नाही. त्या ठिकाणी माझे टेम्पोचे दरवाज्याचे पटया पडलेल्या दिसल्या. त्यावरून माझी कोणीतरी इसमांनी रात्रीच्या वेळेस गाडीचे दरवाज्याच्या काचेच्या बाजूने आत पटटी टाकून लॉक उघडून गाडी चोरून नेले. असल्याची माझी खात्री झाली. तरी देखील आम्ही आजूबाजूचे परीसरात गाडीचा शोध घेतला परंतु गाडी कोठेही मिळून आलेली नाही. चोरीस गेलेल्या टेम्पोचे वर्णन खालीलप्रमाणे
१
३,००,०००/-
एक पांढ-या रंगाचा महिंद्रा कंपनीचा पिक अप बोलेरो नंबर MH- 14-EM-1383 त्याचा चॅसीस नंबर MA1ZN2GHKE1K77672, चॅस इंजिन नंबर GHEIK59626 फिरोज शहाबुद्दीन शेख यांचे नावावर असलेला जू.वा. किं.अं.
एकूण रूपये ३,००,०००/-
वरील वर्णनाचा पिक अप टेम्पो मी दि.०५/०६/२०२३ रोजी रात्री ८:०० ते दि. ०६/०६/२०२३ रोजी सकाळी ८:०० वाजणेचे मुदतीत सूर्या हॉस्पीटल मुटकेवाडी समोर पार्क करून ठेवलेला असताना कोणीतरी अज्ञात इसमाने माझे सहमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेला म्हणून माझी अज्ञात चोरटया विरूध्द तकार आहे. चोरीस गेलेला पिक टेम्पो मिळून आल्यास तो मी पाहून ओळखेन.
माझा वरील खबरी जबाब माझे सांगणे प्रमाणे लॅपटॉपवर टाईप करण्यात आलेला असून तो माझे सांगणे प्रमाणे बरोबर व खरा आहे.. समक्ष
वरील खबर दिली सही
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे