
चाकण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.
चाकण महात्मा फुले चौक येथे आतीक शौकत पटेल या पथारी व्यवसायिकाने आपल्या हातगाडी समोर दुचाकी पार्क केल्याचा मनात राग धरून पठारवाडी येथील राजेंद्र यशवंत आल्हाट कॉम्प्युटर इंजिनियर या आयटी क्षेत्रात उच्च पदस्थ असलेल्या तरुणाला अमानुषपणे मारहाण केली. सदर घटनेने चाकण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दिनांक 11/5/2023 रोजी राजेंद्र आल्हाट हा बहीण विजया हिला महात्मा फुले चौक येथिल शिवशाही करियर अकॅडमी येथे पोलीस भरती च्या ऍडमिशन साठी घेवून आला होता. यावेळी राजेंद्र याने आपले दुचाकी वाहन नगरपरिषद प्रशासन चाकण व पोलीस प्रशासन चाकण यांनी ठरवून दिलेल्या फुटपाथ वरील पार्किंग मध्ये शिस्तबद्ध रित्या पार्क केले होते. परंतु त्याच फुटपात वर टू व्हीलर पार्किंग वरच बेकायदेशीरपणे आतिक शौकत पटेल नामक इसम हा अत्यंत जीर्ण झालेल्या थ्री व्हीलर टेम्पोत सोडा, कोल्ड्रिंक विकण्याचा व्यवसाय करत आहे. याच थ्री व्हीलर गाडी समोर राजेंद्र याने त्याची टू व्हीलर पार्क केल्याचा मनात राग धरून राजेंद्र याला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत अतिक याने हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मुळे राजेंद्र च्या तोंडातून मोठ्या प्रमाणात ,रक्तस्राव झाला व शरीराला इतर ठिकाणी इजा झाली तसेच रितिक याने कु विजया हिलाही अंगावर धावून जात शिवीगाळ केली. याचवेळी प्रसंगावधान राखत राजेंद्र यांनी त्या ठिकाणावरून निघून जाण्याचा प्रयत्न केला अन्यथा माथेफिरू आतिक याने रागाच्या भरात राजेंद्र याच्या जीवाचे बरे वाईट केले असते. अतिक याच्या जाचाला महात्मा फुले चौक येथील स्थानिक व्यावसायिक कंटाळले असुन त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची साथ असल्याचे बोलले जात आहे. राजेंद्र याने अतिक शौकत पटेल या माथेफिरू इसमाच्या विरोधात चाकण पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदवली असून अतिक च्या विरोधात अदखलपात्र नं 1117/2023 भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 323, कलम 504 व कलम 506 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असला तरी राजेंद्र व त्याचे कुटुंबीय घडलेला प्रसंग पाहता ही कारवाई साजेशी नसल्याची खंत व्यक्त करत आहे. राजेंद्र याने नगरपरिषदेला सदर इसम हा तेथील व्यावसायिक व वाहतुकीला अडथळा निर्माण करत असल्याचे लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे. व चाकण पथारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनाही सदर इसमा बद्दल तक्रार करणार आहे. सदर घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड करत आहेत. पुढील
अस्सल न्यूज महाराष्ट्र