
गणेगाव खालसात शस्त्रधारी चोरट्यांचा दरार
शिक्रापूर वार्ताहर : गणेगाव खालसा तालुका शिरूर येथील पद्मावती वस्ती येथे चार शस्त्रधारी चोरट्यानी कोयता व कुऱ्हाडीचा धाक दाखवत दांपत्याला मारहाण करून रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने असा सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे चार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तालुका शिरूर येथील पद्मावती वस्ती मध्ये राहणारे संजय पवार हे 15 जून रोजी रात्रीच्या सुमारास कुटुंबीयांसह घरात झोपलेले असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात चोरटे दरवाज्याची कडी उचकटून हातात कोयता कुऱ्हाड लाकडी दांडके घेऊन घरात शिरले दरम्यान संजय हे जागे झाले असता चोरट्यांनी त्यांना कुराड व कोयत्याची धाक दाखवत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली, त्यावेळी दोघांनी त्यांना धाक दाखवत त्यांची पत्नी पुष्पा पवार यांच्या गळ्यातील कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले तसेच त्यावेळी कपाट उघडून कपाटातील दागिने असे तब्बल पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच तीस हजार रुपये रोख रक्कम असा अंदाजे सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी काढून घेऊन पोबारा केला याबाबत संजय मोतीराम पवार वय 32 वर्ष राहणार पद्मावती वस्ती गणेगाव खालसा तालुका शिरूर जि.पुणे रा.रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी चार अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे हे करत आहे.
कु.सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432 /7350559916