प्राथमिक आरोग्य केंद्र ,कडूस येथे डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून आले असल्याने-आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

Spread the love

पुणे खेड…

प्राथमिक आरोग्य केंद्र ,कडूस येथे डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून आले असल्याने-
आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तालुका आरोग्य कार्यालय खेड यांचे मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र कडूस आणि राजगुरुनगर येथील कर्मचारी यांची पथके बनवली आहेत. चांडोली ,कडूस येथील घरांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक घरातील पाण्याने भरलेली भांडी,कुंड्या, फ्रिज , हौद यांची पाहणी करून त्यातील डास अळ्या नष्ट करण्यात येत आहेत .
संशयितांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत.
नागरिकांना आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पाण्याचा साठा करू नका, गप्पी मासे पाळा, गटारे वाहती करा आणि डास प्रतिबंधक मलम आणि मच्छरदाण्यांचा वापर करा. हे संदेश आरोग्य विभागामार्फत देण्यात येत आहेत.
ग्रामपंचायत कडूस यांचेमार्फत गावात धूर फवारणी, कीटकनाशक औषधींची फवारणी करण्यात आली आहे .
ताप ,अंगदुखी, अशक्तपणा अशी कोणतीही लक्षणे वाटल्यास तत्काळ आरोग्य विभागासोबत संपर्क करावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र मोहिते यांनी ग्रामस्थांना केले आहे.

अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9370612656

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents