खेड पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष “पोलिस निरीक्षक” मा.राजकुमारजी केंद्रे सरयांनी काल मंगळवार दि. 20 रोजी सायंकाळी व्यापारी महासंघासोबत बैठक आयोजित केली होती..या बैठकीसाठी अनेक व्यापारी बांधव उपस्थित होते…

Spread the love

खेड पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष “पोलिस निरीक्षक” मा.राजकुमारजी केंद्रे सर
यांनी काल मंगळवार दि. 20 रोजी सायंकाळी व्यापारी महासंघासोबत बैठक आयोजित केली होती..
या बैठकीसाठी अनेक व्यापारी बांधव उपस्थित होते…
यावेळेस,
1) नागरिकांची ऑनलाईन होणारी आर्थिक फसवणूक..
2) दुकानात होणारी चोरी किंवा दरोडे याबाबत घ्यावयाची खबरदारी…
3) रहदारी संदर्भात चर्चासत्र..
या विषयांवर अतिशय समर्पक चर्चा करण्यात आली..
व्यापारी बांधवांकडुन काही सुचना करण्यात आल्या त्यास पोलीस निरीक्षक मा.केंद्रे सर यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले..
रहदारी संदर्भात घ्यावयाची खबरदारी म्हणून काही नियमावली देण्यात आली..
कुठल्याही व्यापारी बांधवाने,आपल्या दुकानांचे फलक रस्त्यावर किंवा दुकानाच्या चौकटीबाहेर लावुच नयेत किंवा ठेऊ नयेत..
आज बुधवार दि. 21 रोजी दिवसभरात हे सर्व फलक काढून घ्यावेत अन्यथा उद्या गुरुवार नंतर हे फलक प्रशासनाकडून जप्त करण्यात येतील..
व्यापारी वर्गाने आपले दुचाकी किंवा चारचाकी वाहन रस्त्यावर किंवा दुकानाचे समोर अडचण निर्माण होईल अशा ठिकाणी न लावता सुरक्षित ठिकाणी किंवा रहदारीस अडचण येणार नाही अशा ठिकाणी पार्क करावे तसेच ग्राहकांची वाहने देखील सुरक्षितपणे पार्क करावीत..
पथारी व्यावसायिकांनी रस्त्यावर कुठेही बसु नये..त्यांना प्रशासनाने पर्यायी जागा द्यावी..
पार्किंग साठी उपलब्ध P1/P2 चा कटाक्षाने वापर करावा..
ट्रान्सपोर्ट द्वारे आपल्या दुकानात येणारा माल सुरक्षित वेळेत उतरुन घ्यावा किंवा रहदारीस अडचण निर्माण होणार नाही याची ट्रान्सपोर्ट वाहन आणि संबंधित व्यावसायिक यांनी दक्षता घ्यावी..
ऑनलाईन होणारी आर्थिक फसवणूक हा विषय अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत असून गंभीर होत आहे.. याबाबत व्यवहार करताना “दक्ष” रहाणे हाच सर्वात उत्तम पर्याय आहे..आपला OTP किंवा बॅंक Details कुणाबरोबरही शेअर करु नका..असे सुचविण्यात आले..ज्या व्यापारी बांधवांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे त्या व्यापारी बांधवांना योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन मा.केंद्रे सर यांजकडुन देण्यात आले..
रात्री दुकानात होणारी चोरी रोखण्यासाठी सर्वच व्यावसायिकांनी उत्तम प्रतीचे CCTV कॅमेरे बसवावेत..
रात्री वाॅचमेन किंवा गुरखा याचे नियोजन करावे..त्यासाठी दिली जाणारी मानधन रक्कम सर्व व्यावसायिकांकडून दिली जावी..
दुकानात उत्तम प्रतीची security system (alarm) बसवावी..
प्रशासनातर्फे संपूर्ण गावात CCTV बसविण्याचे प्रयत्न सुरु आहेत..
मोठी रक्कम शक्यतो घरात, दुकानात ठेऊच नये..
मोठ्या रकमेचे व्यवहार शक्यतो स्वतःच करावेत..
पोलीस कर्मचारी संख्या अतिशय तोकडी आणि वाढती लोकसंख्या विचारात घेता प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी पोलिस यंत्रणेची दमछाक होत आहे त्यामुळे नागरिकांनीच जबाबदारीने आणि योग्य दक्षता घेऊन रहावे जेणेकरून गुन्हे घडणारच नाहीत..
अशा पद्धतीने अतिशय योग्य ठरतील अशा सुचना मा.केंद्रे सर यांजकडुन देण्यात आल्या..
वेळात वेळ काढुन आणि आजारपण असताना देखील व्यापारी महासंघातील बांधवांना योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल कर्तव्यदक्ष “पोलीस निरीक्षक” आदरणीय राजकुमारजी केंद्रे सर यांना “राजगुरुनगर शहर व्यापारी महासंघाच्या” वतीने
मनपूर्वक धन्यवाद….!!
💐🌹🙏👍🏻
बैठकीसाठी विशेष परिश्रम घेतलेले,
“गोपनीय विभागातील”,
मा.सुनिलजी बांडे सो.
मा.अर्जुनराव गोडसे सो.
यांना मनपूर्वक धन्यवाद…!!
💐🌹🙏👍🏻
वेळात वेळ काढुन,
या बैठकीसाठी आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व व्यापारी बांधवांना
मनपूर्वक धन्यवाद…
आपले नम्र..
राजगुरूनगर शहर व्यापारी महासंघ,
राजगुरूनगर,ता.खेड..पुणे..
प्रतिनिधी .अस्सल न्यूज महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents