

पुणे चाकण…
दिनांक २१ जून २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राणुबाई मळा येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश लांडे सर यांच्या नियोजनाप्रमाणे सकाळी प्राणायाम, योगासने, अशी योगाची अष्टप्रकारासह विद्यार्थ्यांनी योगगुरू युसूफ आतार सर, तुकाराम वाटेकर सर, जयश्री भोईर मॅडम, कीर्ती वराडे मॅडम, वैशाली रणपिसे मॅडम,सुनीता मुंगसे मॅडम, गंगा सावंत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली योग साधना केली.* भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा, आपल्या आरोग्याच्या सुदृढतेसाठी हे गरजेचे आहे.
भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा.
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886