
शिक्रापूर (वार्ताहर) : तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथील कुटुंब रुग्णालयात गेलेले असताना चोरटयांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील एकोणीस तोळे सोन्याच्या दागिन्यांसह काही रोख रक्कम असा दहा लाखांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे चोरटयांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे येथील अरुण कणामे हे त्यांच्या घराला कुलूप लावून त्यांच्या पत्नी व मुलांसह रुग्णालयाच्या कामासाठी वाघोली येथे गेलेले होते.सायंकाळी पुन्हा घरी आले असता त्यांना त्यांच्या दरवाजाचे कडी कोयंडे तुटलेले दिसले.त्यां नी घरात पाहणी केली असता घरातील सर्व साहित्य अस्था व्यस्त पडल्याचे दिसून आल्याने त्यांनी घरात जात कपाटांची तसेच बेडरुमची पाहणी केली.त्यावेळी कपाटातील १९ तोळे सोन्याचे दागिने व पंचवीस हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी मेघा अरुण कणामे यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी चोरटयांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार व पोलिस शिपाई नीरज पिसाळ हे करीत आहेत.
कु.सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी अस्सल न्यूज महाराष्ट्र.
8767358432/7350559916