
गुरोरधिकं तत्वं न गुरोरधिकं तपः । तत्वज्ञानात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः ||
गुरूपेक्षा मोठे तत्व नाही, गुरु सेवेपेक्षा मोठे तप नाही आणि गुरु व्दारा प्राप्त तत्वज्ञाना (ब्रह्मज्ञान ) पेक्षा मोठे तिन्ही लोकांमध्ये काही नाही, अशा ज्ञान प्रदान करणाऱ्या गुरुदेवांना नमन असो। नमन असो।। नमन असो।। पूर्ण सद्गुरु शिष्याला तत्वज्ञान ( ब्रह्मज्ञान) प्रदान करून सुप्त असलेल्या आंतरिक चेतनेला जागृत करतो व त्यानंतर मनुष्य विवेकशील, चरित्रवान, निस्वार्थी अशा मनुष्यत्वाच्या गुणांनी संपन्न होतो. अशा सद्गुरुला संत ज्ञानेश्वर महाराजांनी देवा पेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले आहे.

गुरु हा संत कुळीचा राजा । गुरु हा प्राणविसावा माझा । गुरुविन देव दूजा । पाहतां नाही त्रिलोकी ।। अशा दिव्य गुरुंचे पुजन करण्यासाठी धर्म ग्रंथामध्ये व्यास पौर्णिमेचा दिवस निवडला गेला यालाच गुरुपौर्णिमा असे म्हणतात. संस्थान या परंपरे अंतर्गत या वर्षी ही गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा करत आहे. या दिव्य मंगल प्रसंगी आपण सहकुटुंब उपस्थित राहून सामुदायीक आरती, गुरुमहिमेचे विचार व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सादर आमंत्रित आहात.

वेदमंत्रोच्चारण सामूहिक गुरुपूजन व आरती सामूहिक ध्यान-साधना * दिव्य सत्संग प्रवचन व भजन-संकिर्तन महाप्रसाद *ज्ञान – अनुग्रह
प्रवचन सेवा :- स्वामी आदित्यानंद जी (दिल्ली मुख्यालय)
दिनांक :- सोमवार ३ जुलै २०२३ वेळ :- सकाळी १० ते दुपारी ३ वा.
स्थळ श्रेया लॉन्स, चाकण-तळेगाव रोड, चाकण, ता.खेड, जि. पुणे.
संस्थानच्या अधिक सर्व माहितीसाठी – Play Store डाऊनलोड करा DJJS अॅप्लीकेशन किंवा
- स्थानिय आश्रम * दिव्य ज्योति जाग्रति संस्थान, चक्रेश्वर मंदिर रोड, संग्राम दुर्ग किल्याच्या शेजारी, चाकण, ता. खेड, जि. पुणे. मोबा. ९६८९८९९१०४
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886