जिल्हा परिषद प्राथमिक शाळानाणेकरवाडी येथील आदर्श शिक्षक श्री रवींद्र पाटील सर तसेच श्रीमती सीमा राऊत मॅडम *यांची बदली झाल्यामुळे सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला.

Spread the love

कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापिका श्रीमती लक्ष्मीबाई दाते उपस्थित होत्या. 2011 सालापासून श्रीमती सीमा राऊत मॅडम यांनी तसेच 2016 पासून श्री रवींद्र पाटील सर यांनी नाणेकरवाडी येथे सेवा केली. श्रीयुत पाटील सर एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व,शिष्यवृत्ती मार्गदर्शक म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये परिचित आहेत. श्रीमती सीमा राऊत यांनी शाळेच्या शैक्षणिक- सांस्कृतिक-क्रीडा अशा विविध पातळीवर मार्गदर्शकाची भूमिका पार पाडून शाळेसाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. श्री रवींद्र पाटील सरांना शाळेच्या वतीने पूर्ण पोशाख , शाल श्रीफळ बुके देऊन सन्मानित करण्यात तसेच श्रीमती सीमा राऊत मॅडम यांना साडीचोळी शाल बुके श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.दोन्ही आदरणीय शिक्षकांबद्दल गौरवोद्गार श्री. दत्तात्रय शिवले, श्री नवनाथ कचरे, श्री संतोष तळोले ,श्री प्रवीण पाटील, श्री संभाजी कोरडे,सौ नीता जाधव, सौ मनीषा देवरे /धुमाळ,श्रीमती स्वाती आंधळे आदी मान्यवरांनी व्यक्त केले. दोन्ही शिक्षकांच्या कार्याचा आढावा देत माजी मुख्याध्यापिका श्रीमती लक्ष्मीबाई दाते यांनी शुभेच्छा दिल्या. शाळा व्यवस्थापन समिती, नाणेकरवाडी गाव तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंदाच्या वतीने मुख्याध्यापक श्री. संदिप महादू नाणेकर सरांनी गुरुजनांच्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.* श्री संभाजी कोरडे सरांनी आभार व्यक्त केले.

अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886 आपल्या भागातल्या छोट्या मोठ्या बातम्यांसाठी संपर्क करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents