शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे पोलीस स्टेशन अंतर्गत तीस रोडरोमिओवर कारवाई

Spread the love

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर ) शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे पोलीस स्टेशन अंतर्गत 30 दुचाकी रोडरोमिओ वर कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलीस दुरक्षेत्रात बोलावून विध्यार्थ्यांच्या पालकांना समज देण्यात आली आहे. आगामी काळात शालेय विध्यार्थ्यांनी विनापरवाना रस्त्यावर गाडी चालवली, तसेच गाड्यांचा आवाज करणे, ट्रिपल सीट फिरणे, वेडेवाकडे आवाज काढतात, हॉर्न आणि सायलन्सर यांचा विचित्र आवाज काढणे, अश्या रोडरोमिओ वर कडक कारवाई केली जाईल. असा इशारा शिक्रापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिला. दरम्यान तळेगाव ढमढेरे येथील विविध शाळेसमोर रस्त्यावर अनेक शाळाबाह्या मुले शाळा सुटताना आणि भरताना दुचाकीवर विनाकारण फिरतात, वेडेवाकडे आवाज काढतात. अश्या रोडरोमिओ वर पोलीस लक्ष देऊन तात्काळ कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. पोलीस हवालदार किशोर तेलंग, शंकर साळुंखे, संतोष मारकड,राणी भागवत, पोलीस पाटील पांडुरंग नरके यांनी ही कारवाईत भाग घेतला.

कु. सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432/7769871685 अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886 आपल्या भागातल्या छोट्या मोठ्या बातम्यांसाठी संपर्क करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents