
पिंपरी चिंचवड- मोबाईल फोन कानाला लावून मोबाईलर संभाषण करीत पायी चालत जाणा-या मरिकांचे महागडे मोबाईल, दुचाकीवरुन धुम स्टलिने येवून, मोबाईल हिसकावुन क्षणाचा पळुन जाणा-या गुन्हेगारांच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालणे व हेगारांचा छडा लावणेबाबत मा. पोलीस आयुक्त सो. यांनी गुन्हे शाखांना आदेशीत केले आहे.
गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे मार्गदर्शनारखी पोलीस अंमलदार यांनी मोबाईल स्नॅचिंग गुन्हे घडणा-या भागाती सीसीटीव्ही कॅमे-याची सातत्याने तपासी करुन व गोपनिय बातमीदाराकरवी माहीती मिळवून कसोरि शोध घेतला. मोबाईल स्नॅचिंगचे हे करणारे गुन्हेगार हे निर्जनस्थळावरून मोबाईल फोनवर संभाषण करीत पायी चालत जातांना नागरिकोंपाठीमागुन मोटर सायकलवरुन येवून अचानक मोबाईल हिसकावून धुम सईलने क्षणार्धात गायब होत असल्याने मोटर सायकलचा नंबर व वर्णन मिळुन येत नव्हते. गुन्हे घडणा-या भागात सातत्याने पेट्रोलिंग करुन गमिय बातमीदारांना सतर्क करण्यात आले होते.
गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अलदार अजित सानप व नामदेव कापसे ना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी बातमी मिळाली कि, तीन्हसम हिरो होंडा कंपनीचे स्प्लेंडर मोड सायकल नंबर एम एच १४ बीडब्लु ७०५३ यावरुन संभाजीनगर परिसरा मोबाईल विकायचे आहेत असे सांगुन शियितरित्या फिरत आहेत. बातमीप्रमाणे गुन्हे शाखा युनिट २ चे पक संभाजीनगर भागात तात्काळ रवाना कर संशयित आरोपींचा शोध घेतला व रोटरी क्लब चौक संभाजीनगस्था ठिकाणी सापळा लावुन मोटार सायक्वरून फिरणा-या तीन संशयित इसमांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच नावे १) राज उर्फ नन्या आनंद लष्करे वय १९ वर्षे रा. गोधंळे गल्ली, दत्तनगर – रामनगर पिंपरी २) केशव उर्फ ओम किशोर आलंकार वय १८ वर्षे रा. सचिन टेलर्स जवळ दत्तनगर पिंपरी पुणे व त्यांचा एक विधीसंघर्षीत साथीदार अशी आहेत. आरोपीत यांचेकडे सखोल बास केला असता त्यांनी चिखली,
दीघी व पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मोर सायकलवरुन फिरुन नागरिकांचे मोईन जबरदस्तीने हिसकावून चोरी
केल्याची कबुली दिली आहे.
आरोपीत यांचेकडून एकूण ६ अॅन्डाईड मोबाईल व गुन्हयात वापरलेली मोटर सायकल असा एकूण
१,३८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
उघडकीस आलेले गुन्हे खालीलप्रमाणे-
(५) चिखली पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ४३५/०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे २) चिखली पोलीस ठाणे गुन्हा रजि.नंब४३७ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे
३) दीघी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर २९८ / २०३ भादवि कलम ३९२, ३४ मधील याप्रमाणे गुन्हे उघडकीस आले असुन आरोपीत यांचेकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्ता आहे. आरोपीत यांचेकडे सखोल तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. श्री संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परंशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीमती स्वार गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सतिश माने यांचे मार्गदर्शनखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निक्षक श्री जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश माने, गुन्हे शाखा युनिट चे पोलीस अंमलदार यांनी केली आहे..
(स्वप्ना गोर
पोलीस उप आयुक्त गुन्हे पिंपरी चिंचवड अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886