
मा. सहा. पोलीस अधीक्षक श्री. सत्यसाई कार्तिक सो., उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा विभाग लोणावळा यांचे सुचनांप्रमाणे संकल्प नशामुक्ती अभियान राबविणेत येत आहे. या अभियांनार्तगत विभागामध्ये दारुविक्री, वाहतूक, गुटखा वाहतूक, गुटखा विक्री, गांजा वाहतूक व विक्री अशा केसेस करण्यात आलेल्या आहेत.
मा. सहा. पोलीस अधीक्षक श्री. सत्यसाई कार्तिक साो, उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा विभाग लोणावळा यांचे या संकल्प नशामुक्ती अभियानातून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
१) गांजाचे सेवन करणारे लोकांचेविरुध्द कारवाई -8 २) अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारे वाहनांवर कारवाई
- १
जप्त माल ६, ८३, १२०/- रुपयंचा गुटखा व वाहने. – ३) दारुबंदी कायदयाखाली गुन्हे
२७
जप्त माल २,९४,०१०/- रुपये किंमतीची देशी, विदेशी व गावठी दारु, दि. ११/०७/२०२३ रोजी ग्रे रंगाचा छोटा हत्ती मालवाहतूक टेम्पो नं. MH48 CB 1828 यामधून मुंबई ते पुणे रोडने मुंबई बाजूकडून पुणे बाजूकडे गांजाची वाहतूक होत आहे. अशी पोलीस अंमलदार केतन तळपे यांना खात्रीशिर बातमी मिळाल्याने लागलीच छापा कारवाईकरीता वरीष्ठांना कळवून त्यांचे परवानगीने मौजे वरसोली ता. मावळ जि. पुणे गांवचे हद्दीमध्ये मुंबई ते पुणे हायवे रोडवर एम. एस. ई. बी. रेस्ट हाउसचे समोर सापळा रचून अत्यंत शिताफीने टेम्पो पकडला. त्यामध्ये इसम नामे १) अशोक भूजंग चव्हाण वय ४३ वर्षे रा. धामणी खालापूर ता. खालापूर जि. रायगड व २) शंकर भगवान साळुंखे वय ३० वर्षे रा. ठोंबरेवाडी लोणावळा ता. मावळ जि. पुणे यांचेसह सदर टेम्पोची झडती मध्य २० किलो बिया बोंडासह हिरवट काळसर तपकीरी रंगाचा ओलसर गांजा हा अंमली पदार्थ व अमपो असा एकुण ६, ५०,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला यश आले आहे. सदरबाबत यातील आरोपींच्याविरुध्द लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम ८(क), २(बब, भा. दं. वि. का. क. ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारचा माल सप्लाय करणारे लोकांची फारमोठी साखळी असण्याची शक्यता आहे असा पोलीसांचा अंदाज असून त्या दृष्टीने तपास चालू आहे. अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. किशोर धुमाळ यांनी केले आहे.
–
सदरची कारवाई ही मा. श्री. अंकीत गोयल सो. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण व मा. श्री. मितेश गट्टे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे, पुणे ग्रामीण, मा. सत्यसाई कार्तीक, सहा. पोलीस अधीक्षक, लोणावळा विभाग लोणावळा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. किशोर धुमाळ लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, सहा. पोलीस निरीक्षक / श्री. देविदास करंडे, सहा. पोलीस उपनिरीक्षक / युवराज बनसोडे, पो. ना. / गणेश होळकर, पोलीस अंमलदार/ केतन तळपे, राहुल खैरे, प्रशांत तुरे यांनी कारवाई केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किशोर धुमाळ यानी माहिती दिली आहे.
(किशोर धुमाळ)
पोलीस निरीक्षक लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन