
सकल मातंग समाज खेड तालुक्याच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तालुकास्तरीय जयंतीच्या निमित्ताने आज चाकण चक्रेश्र्वर मंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.सदर बैठकी मध्ये विविध विषयांवर चर्चा करून पुढील रूपरेषा ठरवण्यासाठी निर्णय घेण्यात आले.यावेळी श्री.विठ्ठल शेठ चांदणे,श्री.भाऊसाहेब वायदंडे,श्री.शांताराम पाटोळे, श्री.रत्नेश वैरागे श्री.गुलाबशेठ पवार व विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.