२९/०७/२०२३ पोलीस स्टेशन वाकड माळशिरस जि.सोलापुर येथे लाखो रुपयांची बँक फोडी करणारे टोळीतील दोन चोरटयांना १२ तासात वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

Spread the love

गुन्हयातील मुद्देमालासह अटकवाकड पोलीस स्टेशन हद्दीत दि.०९/०७/२०२३ रोजी फेड बँक, डांगे चौक वाकड येथे दरोडा टाकण्याचा केलेला प्रयत्न पोलीसांचे सतर्कतेमुळे निष्फळ झाला होता. सदर गुन्हयात बँकेची भिंत फोडुन गॅस कटरने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न झाला होता है निष्पन्न झालेने सदर गुन्हयाची दखल घेत मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, क्राईम युनिट यांना रात्रीचे वेळी जास्तीत जास्त पोलीस अधिकारी व कर्मचारी नेमून सतर्क नाकाबंदी करुन, बैंका ज्वेलर्स शॉपी तपासणी करणेबाबत आदेश दिले आहेत.सदरबाबत दाखल असलेला वाकड पोलीस स्टेशन गु. रजि. नं. ६५१ / २०२३ भादविक ३९५,३९८, ३०७, ३५३,४५८.५११, आर्म अॅक्ट ४,२५, महा. पोलीस कायदा कलम ३७(१) (३) मध्ये ०५ आरोपी अटक करणेत आले असून उर्वरीत आरोपीबाबत मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकातील सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण व तपास पथक अंमलदार यांना सखोल तपास करून सर्व आरोपांना अटक करणेबाबत सुचना दिल्या आहेत.त्याप्रमाणे सपोनि संतोष पाटील व पोलीस स्टाफ असे पाहीजे आरोपीचा शोध घेणेकरीता पेट्रोलींग करीत असताना सपोनि संतोष पाटील यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दि. १८/०७/२०२३ रोजी माळशिरस जि.सोलापुर येथे घडलेले गु. रजि.नं. ३८८/२०२३ भादविक ४५७,४५४, ३८०, ३४ या बैंक चोरीचे गुन्हयातील संशयीत आरोपी हा मोहननगर रोड, पिंपरी पुणे येथे येणार आहे. सदर बातमीचा आशय वरिष्ठांना सांगून त्यांचे परवानगीने एम्पायर इस्टेट रोड, मोहननगर पिंपरी पुणे येथे जावून तेथे जावुन मोरवाडी कोटांकडे जाणारे रोडलगत सापळा रचुन थांबले असता तेथे एक पांढरे रंगाची स्विफ्ट डिझायर कार नं. एमएच. १४. एचक्यू. ९७८१ मधुन मिळाले बातमीतील संशयीत इसम व त्याचे सोबत आणखी एक इसम असे उतरलेने लागलीच स्टाफचे मदतीने त्यांना ताब्यात घेवुन त्यांची नाव पत्ते विचारले असता त्यांनी आपली नावे १) फैसल इब्राहीम शेख व २९ वर्षे रा.सावंत यांच्या खोलीमध्ये भाडे तत्वावर, विजयनगर, पिंपळेगुरव, पुणे मूळ रा. सेक्शन ३९, विर तानाजी नगर, एकता मित्र मंडळजवळ, उल्हासनगर-५, जि.ठाणे. २) शाहरुख सत्तार पटवारी वय २८ वर्षे रा. द वाईट हाऊस हॉटेलच्या पाठीमागील चाळीमध्ये, आंध पुणे मुळ रा. मुपी तळनी ता. औसा जि.लातूर अशी सांगीतली. त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी माळशिरस जि.सोलापुर येथे बँक फोडून चोरी केलेची कबुली दिलेने, त्यांची अंगझडती घेतली असतात्यांचे ताब्यातून चोरीतील रोख रक्कम ४,१०,०००/- रुपये जप्त करणेत आली आहे. आरोपी ताब्यात घेतले नंतर सदरची माहीती सोलापुर पोलीसांना कळवून आरोपी व स्विफ्ट कार नं. एमएच. १४. एचक्यु. ९७८१ असे पुढील कार्यवाही करीता सोलापुर ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस पथकाचे ताब्यात दिले आहे.सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सी सहपोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे सी, पोलीस उप आयुक्त, परि- २. पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त सो, बाकड़ विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली (मा. श्री. गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफी बाबाजान इनामदार, सपोफो राजेंद्र काळे, पोहवा बंदु गिरे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. अतिश जाधव, पोहवा, प्रमोद कदम, पोना. प्रशांत गिलबोले, पोना. अतिक शेख, पोना. विक्रांत चव्हाण, पोना. राम तळपे, पोशि, अजय फल्ले, पोशि. भास्कर भारती, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि सौदागर लामतुरे, पोशि विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर, पोशि सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.(डॉ. काकासाहेब डोळे)पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, पिंपरी चिंचवड

अस्सल न्यूज महाराष्ट्र 24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents