दिनांक १५/७/२३ रोजी पोलीस उपनिरीक्षक विकास मडके हे चाकण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्रगस्त करत असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास श्वास हॉस्पिटल मेदनकर वाडी, चाकण, पुणे येथील बँक ऑफ महाराष्ट्र चे एटीएम फोडले आहे

Spread the love

दिनांक १५/७/२३ रोजी पोलीस उपनिरीक्षक विकास मडके हे चाकण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्रगस्त करत असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास श्वास हॉस्पिटल मेदनकर वाडी, चाकण, पुणे येथील बँक ऑफ महाराष्ट्र चे एटीएम फोडले आहे असे समजल्याने सदर त्यांनी ठिकाणी पोहोचून एटीएम सेंटरची पाहणी केली असता बँक ऑफ महाराष्ट्र चे एटीएम मशीनचे चेस्ट डोअर कोणीतरी अज्ञात इसमाने कशाच्या तरी साह्याने उचकटून त्यामधून एटीएम मशीन मध्ये असलेले पैसे काढण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले.

सदर बँक ऑफ महाराष्ट्र चे एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज psi विकास मडके यांनी तात्काळ प्राप्त करून
सदर सीसीटीव्ही फुटेज आधारे आरोपीचे फोटो प्राप्त करून चोरीचा प्रयत्न करणारा लाल टी-शर्ट घातलेला मुलगा याचा फोटो व सीसीटीव्ही फुटेज बीट मार्शल चे कर्मचारी यांना पाठवून शोध घेण्याबाबत मार्गदर्शन करून तात्काळ रवाना केले.

बारा वड्या बीट मार्शल चे पोलीस अंमलदार घनवट व होमगार्ड जरे यांनी सदर सीसीटीव्ही फुटेज व फोटो याच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता सदर चोरी करणारा इसम हा माणिक चौकाजवळ मिळून आला त्यास त्यांनी पकडून हजर केले असता पोलीस उपनिरीक्षक मडके यांनी सदर आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे नाव
मोहम्मद सर्फराज कलाम उद्दीन अंसारी वय 26 वर्ष राहणार जमरोही तालुका विक्रम गंज, जिल्हा रोहतास, राज्य बिहार असे सांगून त्याने गुन्हा केला असल्याचे कबूल केले आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र चे चॅनेल मॅनेजर भगवंत ओम प्रकाश मुळे राहणार बोराडेवाडी मोशी पुणे यांनी सदरबाबत चाकण पोलीस स्टेशनला तक्रार दिले असून सपोनि विक्रम गायकवाड हे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents