


शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी संतुलित आहार योग्य – डॉ. समीक्षा चोरडिया
चाकण वार्ताहर: दि. 22 जुलै
चाकण येथील विश्वशांतीनिकेतन विद्यालय येथे सर्व पालक वर्गांसाठी मुलाच्या बौद्धिक आणि शारीरिक वाढीसाठी विकासासाठी संतुलित आहार आणि पालकांची भूमिका या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले होते. शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता, वाढीसाठी संतुलित आहार, शारीरिक क्षमता वाढण्यासाठी, प्रतिकारशक्ती, वाढण्यासाठी, फलाहार आणि सर्वांगीण संतुलित आहार जे आपल्या ऋतुमानानुसार जे फळ भाजीपाला उपलब्ध आहे त्याचे सेवन करणे आवश्यक आहे. व्हेजिटेबल्स, प्रोटीन, कार्बोहायड्रस, कॅल्शियम, स्निग्ध पदार्थ याचा वापर जेवणामध्ये असावा. जेवणाची वेळ निश्चित असावी. किमान दिवसातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्र जेवण करणे आवश्यक आहे. महिलेचा जेवण बनवताना स्वयंपाक करताना पॉझिटिव्ह विचार असणे आवश्यक आहे मुलांना बाहेरील जंक फूड, फास्ट फूड आणि रेडिमेड फुड याच्यापासून दूर ठेवून घरचा आहार कसा देता येईल याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यावे असं अनमोल मार्गदर्शन आहार तज्ञ चोरडिया यांनी केली. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. पल्लवी पवार यांनी केले. स्वागत प्राचार्या अर्चना प्रवीण आघाव यांनी केले. सर्व शिक्षक वृंदांनी वृंदांच्या सहकार्यांनी हे चर्चासत्र यशस्वी पार पडले. अशी माहिती सौ. संध्या जाधव यांनी दिली.